28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriमाकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार - वनाधिकारी दीपक खाडे

माकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार – वनाधिकारी दीपक खाडे

कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये माकड व वानरांचा उच्छाद प्रचंड वाढला आहे.

कोकणातील माकडांचा उच्छाद थांबवण्यासाठी माकडांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. त्याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर कोकणातील माकडांचा बंदोबस्त होणार आहे. त्यासाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांनी दिली. कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये माकड व वानरांचा उच्छाद प्रचंड वाढला आहे. आंब्यापासून भाजीपाल्याचे अतोनात नुकसान करणाऱ्या कोकणातील माकडांचा-वानरांच्या उच्छादावर कायमस्वरूपी तोडगा करण्याची मागणी सुरू होती.

हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला, तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीचे नुकसान झाले, तर नुकसानभरपाईही मिळत नाही कारण, नक्की कशामुळे नुकसान दाखवणे हे सरकारी यंत्रणेला पटवून देणे अशक्यप्राय होते. या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणात अनेक आंदोलने झाली; मात्र त्यातून मार्ग निघालेले नाहीत. त्यामुळे माकडांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular