27.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरीत वेश्याव्यवसायाबाबत पर्दाफाश एका सूत्रधाराचा कसून शोध सुरू

रत्नागिरीत वेश्याव्यवसायाबाबत पर्दाफाश एका सूत्रधाराचा कसून शोध सुरू

खेडशी आकाशवाणी केंद्राचे समोर गौरव लॉज येथे छापा टाकण्यात आला.

काही दिवसांपुर्वीच खेडशी आकाशवाणी केंद्राजवळील गौरव लॉजवर महिलांच्या देहविक्रीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये कोणकोण सहभागी आहेत, त्याचा तपास सुरू आहे. मुली पुरविणारा आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तो या मुलींना वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरवित असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महिलांची तस्करी (ह्युमन ट्राफिकिंग) सुरू आहे का, याचा तपासही सुरू केला आहे. या प्रकरणाच्या अगदी खोलात जाऊ तपास केला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीत अनैतिक देह व्यापार चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी एक पथक तयार केले होते.

एक डमी गिऱ्हाईक पाठवून खेडशी आकाशवाणी केंद्राचे समोर गौरव लॉज येथे छापा टाकण्यात आला. यावेळीं देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी ४ महिला आणि संशयित अमान करीम खान (रा. कोकणनगर) याला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी अरमान खान याला अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कायद्याअंतर्गत ताब्यात घेऊन अटक केली. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सलमान नामक आणखी एक मुख्य संशयित यामध्ये आहे. तो वेगवेगळ्या मुलींना पुरविण्याचे काम करतो. तसेच या मुलींना वेगवेगळ्या शहरातही नेल्याची माहिती पुढे येत आहे. यावरून पोलिसांनी सलमानचा शोध सुरू केला आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, रत्नागिरीत देहविक्रीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत. तपासात काही माहिती निष्पन्न झाली आहे. त्यानुसार अन्य कोणी निष्पन्न झाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्या चारही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहेत. आणखी काही लोकांचा समावेश असुन त्याअनुषगाने तपास सुरू आहे. अगदी खोलात जाऊन हा तपास केला जाणार आहे. रत्नागिरी, परजिल्ह्यातही हा तपास सुरू आहे. तपासातील माहितीवरून जे निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular