पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याविषयी कथित अपशब्द वापरल्याचा आरोप करत लांजा-राजापूर मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मंगळवारी शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तालुक्यातील सापुचेतळे येथे शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल कथित अपशब्द वापरल्याचा आरोप होतो आहे. याप्रकरणी मंगळवारी शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) लांजा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी माहिती देताना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई तसेच सापूचेतळे येथील पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक शंकर गोरे यांनी सांगितले की, होऊ दे चर्चा या कार्यक्रमात विकासावर चर्चा करत असताना आमदार राजन साळवी यांनी आपण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला. खानवली-सापुचेतळे या रस्त्याला चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. ज्या उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांना मानाची सर्व पदे दिली त्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून खाली खेचण्याचे काम याच उदय सामंत यांनी केले आहे.
त्यामुळे गद्दारांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे उद्गार काढून पालकमंत्र्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी लांजा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली आणि आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांत आमदार म्हणून राजन साळवी यांनी या। २ मतदारसंघात किती विकास केला आहे हे जनतेला ज्ञात आहे. त्यामुळेच मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात घट झाली होती.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण कोणाला गाडते यापेक्षा गेल्या दहा वर्षांत किती विकास झाला हे बघूनच लोक मतदान करतील आणि संबंधितांना . त्यांची जागा दाखवून देतील असे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी सांगितले. त्यानंतर आमदार राजन साळवी यांचा जोरदार घोषणाबाजी करत आला. जाहीर निषेध करण्यात याप्रसंगी शिवसेना (शिंदे गट) तालूकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुका महिला संघटक रसिका मेस्त्री, खानवली विभागप्रमुख अनिल गुरव, युवासेना तालुका अधिकारी राजू धावणे, शहरप्रमुख सचिन डोंगरकर, युवा शहराधिकारी प्रसाद भाईशेट्ये यांच्यासह भाई कामत, संजय तेंडुलकर आदींसह अन्य शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.