26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraउपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून आदित्य ठाकरे यांचा "मुख्यमंत्री" असा उल्लेख, राजकीय वातावरण खवळले

उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून आदित्य ठाकरे यांचा “मुख्यमंत्री” असा उल्लेख, राजकीय वातावरण खवळले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलत असताना मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने, त्यांच्या विधानाने चांगलीच खळबळ माजली.  

पुणे येथे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची निवड केली,  याबाबत माहिती देताना अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाची विधानं केली आहे. बँका चालवणं हे कसं स्पर्धात्मक झालेलं आहे,  यावर वक्तव्य केल. दरम्यान, बँकेच्या वेगवेगळ्या पदांवर कोणाला कोणती जबाबदारी देण्यात आली आहे,  याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट माहिती दिली.

पुण्यातील विधानभवनात कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत असताना, त्यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांना राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत का ! असा प्रश्न विचारला असता, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते ‘जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्या संबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील. अजित पवारांच्या या विधानाने उपस्थित असलेल्या सर्वांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलत असताना मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने, त्यांच्या विधानाने चांगलीच खळबळ माजली.

हा उल्लेख पवारांनी जाणूनबुजून केला की अनावधानाने झाला याबद्दल राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनीच यावर स्पष्टपणे खुलासा केला आहे. आपले शब्द मागे घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असल्याचं स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार खुलासा देताना म्हणाले कि,  मी जर तसा उल्लेख केला असेल तर, त्यातील आदित्य हा शब्द मागे घेतो आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत हा शब्द देतो. अधिवेशनाच्या वेळेला जसे सभागृहात चुकल्यानंतर, जसं शब्द मागे घेतो म्हणतो तसच मी ही माझे शब्द मागे घेतो. राज्याचे, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत.” असे सांगत त्यांनी आपली बोलताना चूक झाल्याचे कबूल केले.

RELATED ARTICLES

Most Popular