29.6 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraराज्यातील नव्या व्हेरीयंट ओमिक्रोनची स्थिती

राज्यातील नव्या व्हेरीयंट ओमिक्रोनची स्थिती

महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येत असताना, सर्व पूर्वपदावर येत असताना अचानक आलेल्या नव्या व्हेरीयंट ओमिक्रोनमुळे एक प्रकारे धडकी भरली आहे. अनेक देशांसह भारतात सुद्धा या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढल्याने धाकधुक निर्माण झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच देशांनी आपापल्या स्तरावर संसर्ग वाढू नये यासाठी उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असताना आलेला हा नवा व्हेरीयंटने पुन्हा खळबळ माजली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. नवा व्हेरियंट समोर आल्यानंतर भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांबाबत अधिक अलर्ट झाले आहेत. काही देशांमध्ये दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांवर आधीसारखे कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट ओमायक्रॉन या विषाणूचे पुणे-पिंपरीमध्ये एकूण सात रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि एक फिनलंडमधून पुण्यात आलेला एक प्रवासी आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या एकूण आठ वर पोहोचली आहे.

घडलेल्या घटनेमध्ये नायजेरियातील एक ४५ वर्षीय महिला तिच्या मुलींसोबत २४ नोव्हेंबरला भावाला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडला आली. त्यांची व त्या दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नायजेरियातून आलेल्या तिघींसह या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दीड व सात वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचा रिपोर्ट राष्ट्रीय विषाणू संस्थेने रविवारी सायंकाळी दिला. त्यामुळे खबरदारी म्हणून त्या सर्वाना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वाची प्रकृती स्थिर आहे.

सहा जणांपैकी नायजेरियातून आलेल्या महिलेला अगदी सौम्य लक्षणे असून, अन्य पाच जणांना कोणतीही विशेष लक्षणे नाहीत. त्याचप्रमाणे बाधितांपैकी तिघे १८ वर्षांवरील असल्याने त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. पुण्यातील उर्वरित एक कोरोना संक्रमित प्रवासी १८ ते २५ नोव्हेंबर दरम्यान फिनलंडला गेला होता. त्याने लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असून, त्याची प्रकृती सुद्धा एकदम स्थिर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular