23.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeKhedखोल दरीत रघुवीर घाटात रस्ता खचला…

खोल दरीत रघुवीर घाटात रस्ता खचला…

रस्त्याला भगदाड पडल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे भागदाड पडले आहे. ‘रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल चाळीस गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. रघुवीर घाट मुख्य राज्य मार्गाचा दरीकडील भाग खचला सातारा जिल्ह्यातील ४० गावांचा संपर्क तुटला घाट हे प्रमुख पर्यटन क्षेत्र आहे. दररोज शेकडो पर्यटक या घाटाम ध्ये निसर्गाचा ओनंद लुटण्यासाठी जातात, त्याच पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा घाट बंद करावा, अशी मागणी खोपी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

४० गावांचा संपर्क तुटला? – रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्याला जोडणारा खेड अकल्पे मार्गावरील रघुवीर घाट हा प्रमुख राज्य मार्गावरील घाट आहे. कोयना अभयारण्यामध्ये व कोयना बॅक वॉटर परिसरात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरं आणि माढा तालुक्यात समाविष्ट असलेल्या शिंदी, वळवण, चाट, वाधावळे, लामज मोरनी, आरव, अकल्पे, तापोळा, याप्रमाणे लहान मोठी अशी ४० गाव घाटाच्या पलीकडे आहेत. त्यांचे दळणवळणाचे साधन हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण हेच आहे. रघुवीर घाटमार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील या दोन तालुक्यात येऊन या गावांमधील लोक आपले जनजीवन सुरू ठेवतात. ही गावे जरी सातारा जिल्ह्यात असली, तरीदेखिल त्यांचा रस्त्यामार्गे संपर्क हा फक्त रघुवीर घाटमार्गे रत्नागिरी जिल्ह्याशीच होतो. याच रघुवीर घाटात ही दुर्घटना घडल्यामुळे या चाळीसगाव यांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पर्यटकांचे आकर्षण – रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी रघुवीर घाट हे एक पर्यटन क्षेत्र आहे. दररोज शेकडो लोक त्या ठिकाणी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जातात, तर वीकेंडला व सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यामध्ये या घाटात हजारो लोक आपल्या कुटुंबियांसह व मित्र- मैत्रिणीसह उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी व कोयना अभयारण्य पाहाण्यासाठी त्या ठिकाणी गदी करतात. त्यांच मार्गावर रस्त्याला भगदाड पडल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका बाजूला उंची डोंगर तर दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी अशी भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी असून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

वाहतूक बंद करा – रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडल्यामुळे सुरक्षिततेचा विचार करून या मार्गावरील वाहतूक व पर्यटन तत्काळ बंद करावे, तसेच तत्काळ त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरुवात करावी, अशी मागणी खोपी गावचे सरपंच यशवंत भोसले, तसेच संजय आखाडे यांनी खेड तहसिलदार कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular