26.2 C
Ratnagiri
Thursday, October 24, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

या खेळाडूच्या टीम इंडियात पुनरागमनाचे भवितव्य काय…

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी आता जवळ...
HomeRatnagiriउपयुक्त पशूची हत्या, आरोपीच्या गोठ्यावर धाड, १० गुरांची सुटका

उपयुक्त पशूची हत्या, आरोपीच्या गोठ्यावर धाड, १० गुरांची सुटका

हिंदुत्ववादी संघटनांसह हिंदू समाज, भाजप्यानेते निलेश राणे आक्रमक झाले होते.

उपयुक्त पशुच्या पिल्लाचे मुंडके सापडल्यानंतर पोलीसांनी अटक केलेल्या संशयीत आरोपीच्या गावातील गुरांच्या गोठ्यावर छापा टाकून १० गुरांची सुटका केली आहे. तसेच या नंतर या संशयीत आरोपी विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे. सुमारे पाच दिवसापूर्वी मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ४४ समोर मुख्य रस्त्यावर उपयुक्त पशुच्या पिल्लाचे शीर आढळून आले त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह हिंदू समाज, भाजप्यानेते निलेश राणे आक्रमक झाले होते.

आरोपीला ४८ तासात अटक करा अन्यथा मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला होता. रविवारी विराट मोर्चा निघाला. मोर्चेकऱ्यांना सामोरे जाणाऱ्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली होती. त्याचप्रम ाणे कोर्टाने आरोपीची ३ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केल्याचे मोर्चेकऱ्यांसमोर जाहीर केले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रविवारी रात्रीपासूनच पोलीसांनी तपासाची गती वाढवली आहे.

रविवारी रात्री ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आपल्या टिमसह संशयीत आरोपीच्या गावातील गोठ्याची पाहणी केली. यावेळी गोठ्यात १ गाय, १. म्हैस, ८ बैल अशी एकूणं १० गुरे आढळून आली. त्यांची राहण्याची, पाणी, चाऱ्याची व्यवस्था योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दहाही गुरांची तेथून सुटका केली. रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपीच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular