30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या 'उमेदवारांना विद्यमान आमदारांनी...

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...
HomeKokanमंदोस वादळाच्या पार्श्वभूमीवर, रायगडात यलो अलर्ट

मंदोस वादळाच्या पार्श्वभूमीवर, रायगडात यलो अलर्ट

बंगालच्या उपसागरावर ‘मंदोस’ चक्रीवादळ प्रतिताशी १० किमी वेगाने वायव्य दिशेला सरकत आहे

कोकण किनारपट्टीवर सध्या वातावरणामध्ये विविध फरक अनुभवायला मिळत आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीत जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, बुधवारपासून पाऊस कमी होईल, तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम किनारपट्टीवर पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात काही ठिकाणी थोडा पाउस पडला.

रायगड जिल्ह्यात मंदोस वादळाच्या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट दिला होता. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, तसेच अवकाळी स्थितीतील पावसामुळे तयार पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे. पिके मळणी, कापणीसाठी तयार असतील, तर ती पिके सुरक्षित ठिकाण ठेवावीत, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे, भाताची मळणी केल्यानंतर पिकातील आर्द्रता वाढू नये म्हणून धान्य घरात न आणताच थेट भात खरेदी-विक्री केंद्रावर पाठवण्याची लगबग सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे पाऊस केव्हाही पडण्याची शक्यता असल्याने भातमळणीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची घाई वाढली आहे.

बंगालच्या उपसागरावर ‘मंदोस’ चक्रीवादळ प्रतिताशी १० किमी वेगाने वायव्य दिशेला सरकत आहे. त्याचबरोबर मध्य पूर्व अरबी समुद्रात चक्रिय स्थिती निर्माण झाली असून याचे पडसाद रायगडमध्ये दिसू लागले आहेत. सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मंदोसची छाया अधिक गडद होत आहे. ऊन-सावलीचा लपंडाव सुरू असून गारठाही वाढला आहे.

उत्तर केरळ ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत तयार झालेली चक्रिय स्थिती तसेच १३ डिसेंबरला किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या दोन्ही स्थितीमुळे इतर जिल्ह्याप्रमाणे रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular