29 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriपोस्टातील रेल्वे आरक्षण सुविधा होणार बंद

पोस्टातील रेल्वे आरक्षण सुविधा होणार बंद

अशीच स्थिती संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील रेल्वेस्टेशनची आहे.

कोकणवासीयांना रेल्वेचे आरक्षण करण्यासाही नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यामुळे राजापूर, लांजा आणि संगमेश्वर येथील पोस्ट कार्यालयामध्ये कोकण रेल्वे आरक्षण सुविधा सुरू केली होती; मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने ही आरक्षण सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुकिंगअभावी आधीच हाल होत असताना आता आरक्षण सुविधेची त्यामध्ये भर पडणार आहे. कोकण रेल्वेमार्गावर विस्ताराने मोठ्या असलेल्या राजापूर तालुक्यासाठी सोल्ये येथे राजापूर रोड हे एकमेव स्थानक असून, त्याच्या जोडीने सौंदळ येथे व्हॉल्टस्टेशन आहे. शहरापासून सुमारे १८ ते २० कि.मी. वर असलेल्या या स्टेशनवर जाऊन रेल्वे आरक्षण करणे प्रवाशांसाठी खर्चिक बाब ठरत होती.

अशीच स्थिती संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील रेल्वेस्टेशनची आहे. या ठिकाणची रेल्वेस्टेशनही लोकवस्ती आणि तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणापासून दूर आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयामध्ये रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र आता पोस्ट कार्यालयातील ही आरक्षण सुविधा कायमची बंद करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेत त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या कोकणवासीयांना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular