27 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriगणेशोत्सवासाठी रेल्वे आरक्षण अवघ्या ३ मिनिटात फुल

गणेशोत्सवासाठी रेल्वे आरक्षण अवघ्या ३ मिनिटात फुल

२५० हून अधिक गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा सोमवार (२३ जून) पासून चाकरमान्यांसाठी गणपती आणि नियमित ट्रेनचे बुकिंग सुरू झाले असले तरी, सालाबादप्रमाणे त्यांना कटू अनुभव आला आहे. सकाळी ८ वाजता बुकिंग सुरू झाल्याबरोबर अवघ्या ३ मिनिटांत गाड्या फुल्ल झाल्या. त्यामुळे चाकरम ान्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याची चर्चा ऐकायला मिळते. यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन बुधवार दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना ६० दिवस आधी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण आता गणेश चतुर्थीची तारीख पाहता साधारण २३ जूनपासुन सुरु झाले. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टला म्हणजे मागील वर्षीपेक्षा लवकर साजरा होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने दरवर्षीप्रम ाणे यावेळी २५० हून अधिक गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे चाकरमानी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस कोकणात जात असतात. त्यामुळे २५ आणि २६ ऑगस्टपर्यंत कोकणात पोहचण्यासाठी गाड्यांचे आरक्षण करण्याची चाकरमान्यांची धडपड सुरू आहे. रेल्वेनेही २३ जून ते ४ जुलै या दरम्यान बुकिंगची व्यवस्था केली आहे.

बुकिंग फुल्ल – पण सोमवारपासून आरक्षणाला सुरुवात झाली असली तरी, अवघ्या ३ मिनिटांतच बुकिंग फुल्ल झाल्याचा मेसेज इच्छुक चाकरमान्यांच्या मोबाईलवर खणखणला, असे सांगण्यात येते. सोबतच याबद्दल रेल्वेने खेदही व्यक्त केला. सर्वसामान्य चाकरम ान्यांना मात्र दरवर्षीप्रमाणे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची शंका आली, अशी प्रतिक्रिया चाकरमानी लोकांत ऐकायला मिळते.

कालावधी कमी केला – गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. हे लक्षात घेऊन याहीवर्षी कोकण रेल्वेने गणपतीसाठी स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच रेल्वेने गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून तिकीट आरक्षित करण्याचा कालावधी निम्म्यावर आणला आहे. पूर्वी १२० दिवस आधी बुकिंग करता येत होते, नंतर ९० दिवस आणि आता फक्त ६० दिवसांचा कालावधी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular