27.3 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeDapoliपावसाच्या पाण्यावरून दोन गटामध्ये मारामारी, गुन्हा दाखल

पावसाच्या पाण्यावरून दोन गटामध्ये मारामारी, गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील बुरोंडी मोहल्ला येथे पावसाच्या पाण्याच्या क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे.

जिल्ह्यात अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी होते तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात साचून राहिले होते.

दापोली तालुक्यातील बुरोंडी मोहल्ला येथे पावसाच्या पाण्याच्या क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारी रोजी रात्री अचानक पाऊस पडल्यामुळे रिजवान हुस्सैनी यांच्या घरामध्ये पाणी साचले होते.

रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास रिजवान हुस्सैनी पुढील दरवाजातून पावसाचे पाणी बाहेर काढत होत्या. तेव्हा पाणी शेजारी असलेल्या घराच्या शौचालयाच्या दारासमोरून वाहत होते. याचा राग मनात धरून अब्दुल रहमान हुस्सैनी व रियाना हुसैनी हे रिजवाना हिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून गेले. या घटनेची माहिती जमातीचे प्रमुख नेते यांच्या कानावर घालण्याकरिता रिजवाना हुस्सैनी गेल्या होत्या.

तेव्हा साहिल हुस्सैनी, कमाल हुस्सैनी, अब्दुल रहमान हुस्सैनी, सलमान हुसैनी, जिंनात हुस्सैनी सर्व रा. जमाती मोहल्ला बुरोंडी यांनी रिजवाना हिच्या घरात शिरून घरात असणार्‍या महेक हुस्सैनी हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. हे भांडण सोडविण्याकरिता रिजवाना मध्ये गेली असता तिला देखील केस आणि मानेला घट्ट पकडून बाजूला करण्यात आले. याप्रकरणी रिजवाना यांनी दापोली पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार हळदे करीत आहेत. शुल्लक कारणावरून झालेल्या मारामारीमुळे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची वेळ आली.

RELATED ARTICLES

Most Popular