26.3 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeKokanकोकणात ३ दिवस पाऊस कोसळणार

कोकणात ३ दिवस पाऊस कोसळणार

३ डिसेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडणार आहे.

भारतात पुन्हा नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालचा उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे ३ डिसेंबर रोजी नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ येणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या दक्षिण भागात चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे निर्माण झालेले क्षेत्र चक्रीवादळात बदलणार आहे. ३ डिसेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. आयएमडीकडून तामि ळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालचा उपसागरात निर्माण झालेले हे चक्रीवादळ ताशी ९ किमी वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जात आहे. आता पुढील १२ तासांत हे वादळ खोल दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित होणार आहे.

चक्रीवादळाच्या धोक्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. चक्रीवादाळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबईत तापमान घसरणार असून हवेचा कडाका वाढणार आहे. अरबी समुद्रात दोन महिन्यांपूर्वी तेज चक्रीवादळ आले होते. २१ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळास ‘तेज’ हे नाव देण्यात आले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ २६ ओमानच्या दिशेने जाऊन शांत झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular