27.3 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraकेरळला पावसाचा तडाखा पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर

केरळला पावसाचा तडाखा पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले असून राज्यातील नद्यांची पातळी वाढली आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधगिरीचा उपाय म्हणून नागरिकांना समुद्र आणि नदीकाठावर न जाण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले, की नागरिकांना सजगता बाळगण्याची सूचना दिली असून राज्यातील हजारो नागरिकांना ११२ मदत छावण्यांत दाखल केले आहे. तसेच विविध दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यु झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय हवामान खात्याने कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात रेड अॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय सात जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.

नद्यांची पातळी वाढत असल्याने राज्यात बहुतांश भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अनेक घरांची नासधूस झाली. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.दक्षिण कन्नड आणि उड्डपीत पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील साजीपामुन्नूर येथे ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. घरावर दरड कोसळल्याने त्यात अडकून त्यांचा मृत्यू झाला. झरिना असे मृत महिलेचे नाव असून तिची मुलगी साफा (वय २०) हिला वाचविण्यात यश आले.

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत तिला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. जिल्ह्यातील आपत्कालिन निवारण यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करत पाण्यात आणि पावसात अडकलेल्या ५३ जणांना वाचविले मुल्की तालुक्यात दोन मदत शिबिर सुरू करण्यात आले आहे. पुत्तुर- पानाजे रस्ते बंद झाला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील २९ घरांची पडझड झाली आहे. तारा तुटल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. पावसामुळे दक्षिण कन्नड आणि उड्डपीत शुक्रवारी शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली.

पंजाब-हरियानात पावसाची हजेरी – चंडीगड पंजाब आणि हरियानातील काही भागात गेल्या चोवीस तासात विक्रमी पावसाची नोंद झाली. अमृतसर, जालंधरमधील नुरमहाल, गुरुदासपूर, लुधियाना, पठाणकोट, रुपनगर, मोहाली येथे दमदार पाऊस पडला. अमृतसरला ४३.२ मिमी तर नुरमहाल येथे ३२.५ मिमी पावसाची नोंद झाली.. हरियानातील महेंद्रगड (१७ मिमी), हिसार (४.२ मिमी), पंचकुला (२ मिमी), फतेहबाद (१ मिमी) पावसाची नोंद झाली.

RELATED ARTICLES

Most Popular