26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraराज्य सरकारच्या आगामी निवडणुकीच्या निर्णयावर राज ठाकरे आक्रमक

राज्य सरकारच्या आगामी निवडणुकीच्या निर्णयावर राज ठाकरे आक्रमक

देशापेक्षा महाराष्ट्राचा कायदा वेगळा आहे का?  हा कसला खेळ चालू आहे? असाही सवाल संतापून राज ठाकरे यांनी विचारला आहे!

आगामी निवडणुकांसाठी ठाकरे सरकारनं महानगरपालिकां साठी मोठा निर्णय घेतला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मुंबई सोडून इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धती असणार असून, तर मुंबईमध्ये एक वॉर्ड पद्धत असेल. प्रस्ताव हा चार सदस्यीय प्रभागाचा होता. पण मंत्रिमंडळातील काही नेत्यांचं म्हणणं होतं की ३ सदस्यीय प्रभागच योग्य ठरेल. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ३ सदस्यी प्रभाग निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब केला. नगरपरिषद आणि पालिकेत २, आणि नगर पंचायतीमध्ये १ प्रभाग पद्धती असेल. यामुळे त्या भागातील नागरिकांना नागरी सुविधा देणं सोयीच ठरण्यासाठी हा महाविकास आघाडीने एकमताने घेतलेला निर्णय असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नव्या प्रभाग रचनेवर टीका केली आहे. राज ठाकरे त्यावेळी म्हणाले कि, अशी कोणतीही पद्धत देशात कुठेही अस्तित्वात नसताना महाराष्ट्रात हे कुठून आणि का सुरू झाले, यामागचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणं हेच आहे.

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तीन, दोन आणि एकसदस्यीय व्यवस्था असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून आक्षेप घेतला जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलीच झाडाझडती केली आहे. देशापेक्षा महाराष्ट्राचा कायदा वेगळा आहे का?  हा कसला खेळ चालू आहे? असाही सवाल संतापून राज ठाकरे यांनी विचारला आहे!

मुळात अशी कोणतीही पद्धत देशात कुठेही असताना, सगळीकडे केवळ आमदारकी, खासदारकी, पालिका, ग्रामपंचायतीपर्यंत एकच उमेदवार हीच पद्धत चालत आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये त्यातून आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करणे आणि पैसा ओतून निवडणूक जिंकणे. पण याचा त्रास लोकांना का? एका उमेदवाराला मत देण्याऐवजी तीन उमेदवारांसाठी लोकांनी का मतदान करायचे ? जनतेला गृहीत धरून  हव्या त्या पद्धतीने प्रभाग करायचे, हे योग्य नाही.

RELATED ARTICLES

Most Popular