29.2 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeRatnagiriरत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची धाड

रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची धाड

रत्नागिरीतील अनेक अवैध व्यवसायांवर रत्नागिरीच्या सतर्क पोलिसांची नजर असून, पोलिसांच्या सावधगिरीमुळे अनेक गुन्हे घडण्याच्या आधीच अनेक ते टाळण्यात पोलिसांना यश मिळत आहे. रत्नागिरी पोलिसांच्या कार्यामुळे विविध प्रकारच्या घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसला आहे. आणि काही अवैध धंद्यांची खबर मिळताच पोलीस तत्परतेने घटनास्थळी दाखल होऊन छापा मारतात, आणि योग्य ती कारवाई करतात.

सध्या जिल्ह्यामध्ये दारू विक्रीचे पेव वाढले आहे. गोव्यामध्ये दारू महाराष्ट्राच्या मानाने स्वस्तात मिळत असून अनेक जण तिथून दारू आणून इथे विकण्याचे काम करतात, तर काही जण हे धंदे चोरी छुपे करत असतात. राजापूर तालुक्यातील पन्हळे तर्फ सौंदळ मोरेवाडी येथे धाड टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरीच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता १ हजार ३१९ रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक अमोल भोसले यांनी याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली आहे.

रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाला पन्हळे तर्फ सौंदळ मोरेवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्री होत असल्याची खबर मिळाली होती. प्रशांत दत्ताराम सरफरे नामक व्यक्ती ही गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याची माहिती समोर आली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गुरुवारी संध्याकाळी धाड टाकून ही कारवाई करत सरफरे याच्याकडील १३१९ रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. तसेच सदर प्रकरणी पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये सरफरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल जाधव करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular