26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRajapurराजापुरातील प्रभारी निवासी नायब तहसीलदार लाच घेताना ताब्यात

राजापुरातील प्रभारी निवासी नायब तहसीलदार लाच घेताना ताब्यात

पहिल्यांदी या अधिकाऱ्याने १५ हजार रुपयांची मागणी केली होती

सरकारी कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या हातावर काही चिरीमिरी ठेवली तरच ती कामे वेगाने पार पडतात. पण कायद्याने लाच देणे आणि घेणे सुद्धा एक प्रकरचा गुन्हा आहे. परंतु, शासकीय कामांमध्ये येणारे अडथळे अशाच पैशांच्या स्वरुपात दिल्या जाणाऱ्या लाचेमुळेच दूर होतात. अर्थात सर्व अधिकारी आणि कर्मचारी असे लाचखाऊ नसतात. परंतु, एखाद्या अशा लाचखोर अधिकाऱ्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांची सुद्धा नावे त्यामध्ये जोडली जातात.

पत्नीच्या नावे असलेल्या ७०ब दाव्याच्या निकालाची ऑर्डर तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी १० हजार रुपयांत तडजोड करून ती स्वीकारताना राजापुरातील प्रभारी निवासी नायब तहसीलदार अशोक गजानन शेळके वय ५८ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. रत्नागिरी लाचलुचपत विभागामार्फत अनेकदा सांगण्यात आले आहे कि, अशा प्रकारे जर कोणी शासकीय कामासाठी लाच मागत असेल तर लाच न देता आमच्या कार्यालयाला संपर्क करा.

पहिल्यांदी या अधिकाऱ्याने १५ हजार रुपयांची मागणी केली होती, परंतु तडजोडीअंती ती १० हजार रुपयांवर फायनल करण्यात आली. शेवटी १० हजारावर फायनल झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे सविस्तर माहिती दिली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. आणि या लाचलुचपत विभागाच्या कामगिरीमध्ये या सापळ्यात अशोक शेळके हा १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडला.

सदर प्रकरणाचा कसून तपास सुरु केला असून, संबंधित अधिकाऱ्यावर पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जण काम कमी वेळात पूर्ण व्हावे यासाठी संबंधिताना लाच देतात, त्यामुळे तशी अपेक्षा ते सर्वच जणांकडून ठेवू लागतात.

RELATED ARTICLES

Most Popular