25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeDapoliआधी लग्न करून बघा मग संसार काय असतो ते कळेल, कदमांचे टीकास्त्र

आधी लग्न करून बघा मग संसार काय असतो ते कळेल, कदमांचे टीकास्त्र

मातोश्रीवर देखील खोके गेलेत, तोंड उघडायला लावाल तर भुकंप होईल. यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबेटीस कसा होत नाही असेही कदम म्हणाले.

रामदास कदम यांनी दापोलीत घेतलेल्या सभेमध्ये शिवसेना कोकणी माणसाने मोठी केली. आजची सभा बाळासाहेब ठाकरे बघत असतील आणि म्हणत असतील की, माझा मुलगा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामुळे बिघडलाय, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय. त्यांनी यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी सणकून टीका केली आहे. ते म्हणाले, सार्वजनिक सभा घेऊन “टुनटुन करत खोके खोके बोलत आहेत, आधी लग्न करून बघा मग संसार काय असतो ते कळेल. त्यावेळी खोके काय ते कळेल, असा सणसणीत टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावलाय.

सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत कडक शब्दात टीकास्त्र सोडलं आहे. “राष्ट्रवादीसोबत संसार मांडू नका, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जावू नका असे बोललो होतो. “उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही. मातोश्रीवर देखील खोके गेलेत, तोंड उघडायला लावाल तर भुकंप होईल. यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबेटीस कसा होत नाही असेही कदम म्हणाले. त्यावेळी मातोश्रीवरून निघून आलो,  त्यामुळे यापुढे भविष्यात मातोश्रीची पायरी कधीही चढणार नाही.

रामदास कदम म्हणाले, “दापोलीतील शिवाजी महाराज यांचा पुतळा योगेशने बसवला. एकावेळी ९० विकास कामे नगरपरिषदेत सुरु केली होती. विकासाला किंमत नाही का? अजित पवार यांनी पाठवलेल्या खोक्याला किंमत नाही का? आदित्य खोके खोके, गद्दार म्हणत आहेत, परंतु, आदित्य गद्दार तुम्हीच आहात.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांना कसं संपवायचा याचा कार्यक्रम सुरु होता. पर्यावरण खाते मला संपवण्यासाठी दिलं, त्यांना वाटलं मला काही कळणार नाही. प्लॅस्टिक बंदीचा कायदा केला त्यावेळी, आदित्य आपण केला आपण केला म्हणून सर्वाना सांगत होते. दोन वर्ष माझ्या शासकीय बैठकांत अधिकार नसताना देखील ढवळाढवळ करत असत. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री. एखाद्याला संपवून टाकायचं गद्दारी याला म्हणतात. उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असतात. आमच्या मासाहेब कधीच व्यासपीठावर चढल्या नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular