27.3 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeEntertainment“माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जावा आणि तेवढी इच्छा तू पूर्ण कर”...

“माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जावा आणि तेवढी इच्छा तू पूर्ण कर” – दिवंगत रमेश देव

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी दोन दिवसापूर्वी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता.

रमेश देव आणि सीमा देव यांची एका वृत्तपत्राने घेतलेली एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या सदाबहार जोडप्याने दिलेल्या एका खास मुलाखतीत रमेश देव यांनी त्यांची एक इच्छा बोलून दाखवली होती. रमेश देव, त्यांच्या पत्नीला म्हणाले होते,  ‘आपल्या लग्नाला ५३ वर्ष झाली. त्याआधीची चार ते पाच वर्ष आपण एकमेकांना ओळखतो. इतकी वर्ष तू मला प्रेमाची साथ दिलीस. आता माझी एक इच्छा पूर्ण कर. मी आता ९३ वर्षांचा आहे. कधी जाईन काही माहीत नाही.

‘माझी शेवटची एकच इच्छा आहे की, माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जावा आणि तेवढी इच्छा तू पूर्ण कर.’ देवांचं हे वाक्य ऐकून सीमा यांचे डोळे भरून येतात. त्या भावूक झाल्याने पुढे काहीच बोलू शकल्या नाहीत. परंतु, आपल्या अश्रुना रोखून धरत त्या असं काही होणार नाही असा विश्वासही त्या नवऱ्याला देतात.

अशा अजरामर कलाकाराच्या जाण्याने नक्कीच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात आदरांजली वाहून म्हटले आहे कि,  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी दोन दिवसापूर्वी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून अचानक कायमच निघून जाणे खूपच दुःखदायक आहे.

रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तुत्वाने वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे स्नेहसंबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना कायमच आदराचे स्थान होते आणि राहील. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे.

RELATED ARTICLES

Most Popular