24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriराष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी रमजान गोलंदाज आणि सहकाऱ्याचे आमरण उपोषण

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी रमजान गोलंदाज आणि सहकाऱ्याचे आमरण उपोषण

गेले २ दिवस आमरण उपोषण सुरु असून मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यालयातून उपोषणची दखल घेतली गेली मात्र स्थानिक पातळीवर नाही, त्यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे.

राष्ट्रीय महामार्गाची झालेली चाळण लक्षात घेता, महामार्गाची अवस्था बिकट असून त्वरित खड्डे भरा अशी अनेकदा विनंती करून सुद्धा महामार्गचे खड्डे भरले गेले नसून जैसे थे परिस्थिती आहे. उच्च न्यायालयाचे महामार्गावरचे खड्डे तत्काळ भरण्याचे आदेश सुद्धा न पाळता, जाणून बुजून खड्डे भरले गेले नसल्याचे दिसते. लोकांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाबद्दल, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज हे आक्रमक झाले असून, राष्ट्रीय महामार्गविरोधात लेखी पत्र देऊन खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, संबंधित विभागाला खड्ड्याची काहीच जाणीव नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी येथे महामार्गलगत उपोषणास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले

राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले खड्डे भरण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांनी लेखी निवेदन देऊन खड्डे भरण्यासाठी ८ दिवसाची मुदत दिली होती. मात्र संबंधित विभागाने याची काहीच दखल घेन घेतल्याने त्यांच्या विरोधात रमजान गोलंदाज आणि त्यांच्या सहकार्यांनी काल पासून आमरण उपोषणास सुरवात केली आहे. परंतु, दोन दिवस उलटून गेले तरी संबंधित विभागाचे अधिकारी फिरकले सुद्धा नाहीत. आज जर दखल घेतली नाही, तर उद्यापासून राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे रमजान गोलंदाज यांनी जाहीर केले आहे.

सध्या खड्डयात असलेल्या महामार्गावर गाडी चालवणे कठीण बनले असून प्रशासनातील काही आडमुठ्या अधिकाऱ्यामुळे विकासामध्ये अडचणी निर्माण होत असून, कोणत्या लोकप्रतिनिधीचा देखील प्रशासनावर वचक राहिलेला नाही. गेले २ दिवस आमरण उपोषण सुरु असून मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यालयातून उपोषणची दखल घेतली गेली मात्र स्थानिक पातळीवर नाही, त्यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular