अल्पवयीन मुलीला जेवण करण्यासाठी घरात बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने, शारिरीक संबंध प्रस्तापित करणाऱ्या आरोपीला न्यायालयान २० वर्षाची सक्तमजूरी व ११ हजार ५०० रुपयांची दंड ठोठावला. साहिल दत्ताराम मसणे (वय २१, रा. पन्हळे, मसणेवाडी, ता. लांजा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १५ जुलै २०२२ या रोजी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीला जेवण करण्याच्या बहाण्याने घरी बोलवून तर तिच्या घरी जावून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले.. त्यात अल्पवयीन मुलगी सहा महिन्याची गरोदर राहिली. या प्रकरणी पिडीतेच्या नातेवाईकांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ (एफ), ३७६ (बी) ३७६ (जे) (एन) व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ५, ६, प्रमाणे गुन्हा दाखल केला.
तपास लांजा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील करत होत्या. तपासात पोलिसांनी संशयितास अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. मंगळवारी (ता. २०) या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक सरकारी वकिल अॅड. सौ. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राहघरुन न्यायालयाने भादवी कलम ३७६
(एफ) मध्ये १० वर्षे सक्तमजूरी व दोन हजार रुपये दंड, पिडीतेच्या संम त्ती शिवाय वारंवार शारिरीक संबंध प्रस्तापित करण्याखाली भादवी कलम ३७६ (बी) २० वर्षे सक्तमजूरी व २ हजार दंड, ३७६ (जे) (एन) १० वर्षे सक्तमजूरी २ हजार दंड, ठार मारण्याची धमकी भादवी ५०६ मध्ये ३ वर्षे सक्तमजूरी ५०० रुपये दंड तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ५, ६, प्रमाणे २० वर्षे सक्तमजूरी आणि २ हजार दंड, कलम (१२) नुसार १ वर्षे सक्तमजूरी ५०० रुपये दंड व (८) मध्ये ३ वर्षे सक्तमजूरी ५०० दंड ठोठावला. या शिक्षा आरोपीला एकत्रीत भोगायच्या आहेत. न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजूरी व ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. यातील ७ हजार पिडीत मुलीला द्यावयाचे आहेत.

