26.4 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriवन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्यान्वये तिघांना अटक

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्यान्वये तिघांना अटक

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे मंगळवारी रात्री वॉलरस या दुर्मिळ प्राण्याच्या दातांची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून वॉलरसचे दात, वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली कार वन विभागाच्या पथकाकडून जप्त करण्यात आली आहे. दुर्मिळ असलेले वॉलरसचे दात या तिघांना नेमके कोठून मिळाले. ते त्यांची विक्री कुठे करणार होते? याचा वन विभाग शोध घेत आहे.

वॉलरस हा प्राणी विशेष करून आर्टिक महासागरात आढळतो. त्याच्या दातांची किंमती जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक आहे. परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड त्यांच्या एका खबऱ्याने हि माहिती दिली कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिघेजण वॉलरस या दुर्मिळ प्राण्याच्या दातांची तस्करी करणार असल्याची बातमी दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला.

मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक कार वन विभागाच्या पथकाने अडवून गाडीची झाडाझडती घेतली. यावेळी गाडीमध्ये वॉलरस या दुर्मिळ प्राण्याचे दात आढळून आले. त्यानंतर वन व पोलीसांच्या पथकाने या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांविरोधातही वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे.

कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, विभागीय वन अधिकारी श्री. दिपक खाडे, सहा. वनसंरक्षक श्री. सचिन निलख व पोलिस निरिक्षक श्री. हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड, वनक्षेत्रपाल फिरते पथक चिपळूण रत्नागिरी, श्री. राजेंद्र पाटील,  तसेच पोलीस हे.कॉ.प्रशांत बोरकर, पोलीस हे.कॉ.शांताराम झोरे, पोलीस हे.कॉ. बाळू पालकर, हवालदार हाईड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांचा सहभाग यांनी ही कामगिरी पार पाडली.

RELATED ARTICLES

Most Popular