32.3 C
Ratnagiri
Wednesday, December 4, 2024

चिपळूण कापसाळ महामार्गावर गव्यांचा मुक्त संचार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळील कापसाळ येथे...

हापूसचा हंगाम दीड महिन्यानी लांबला…

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण...
HomeRatnagiriसीएनजीच्या तुटवड्यामुळे पंपावर लांबच्या लांब रांगा, चालक त्रस्त

सीएनजीच्या तुटवड्यामुळे पंपावर लांबच्या लांब रांगा, चालक त्रस्त

एकीकडे रेल्वेला गर्दी तर दुसरीकडे सीएनजीच्या तुटवड्यामुळे इच्छितस्थळी पोहचताना चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

कोकणात सणासुदीला अनेक चाकरमानी गावी येतात. आणि नेमकं त्याच वेळेला जिल्ह्यात इंधनाची टंचाई जाणवत असते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने, अनेकांनी सीएनजी वाहनाची खरेदी केली. किंवा असलेल्या वाहनांना सीएनजी किट बसवण्यात आले आहे. जेणेकरून इंधनावर होणारा वाजवी खर्च कमी होईल.

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा परतीचा प्रवास प्रचंड खडतर होत आहे. एकीकडे रेल्वेला गर्दी तर दुसरीकडे सीएनजीच्या तुटवड्यामुळे इच्छितस्थळी पोहचताना चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोरोनाच्या महामारीनंतर दोन वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये  चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही चाकरमानी आपल्या खासगी वाहनाने तर काही रेल्वे, एसटीने आपापल्या गावी पोहोचले आहेत.

सोमवारी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. परतीच्या प्रवासाला लागलेल्या चाकरमान्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. एकीकडे रेल्वेला प्रचंड गर्दी तर जादा सोडण्यात आलेल्या एसटीना देखील प्रचंड गर्दी दिसून आली आणि त्यात सीएनजी गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासू लागल्याने वाहनचालक मेटाकुटीस आले होते.

रत्नागिरी शहरांमध्ये असलेले सीएनजी पंपावरती मंगळवारी सकाळपासून मोठ्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. त्यामध्ये जास्त प्रमाणात रिक्षांची संख्या होती. काही पंपावर तर सीएनजी शिल्लक नाही त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांनाही सीएनजीकरिता आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला. सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रांगेतच राहून अर्धा दिवस फुकट जात असल्याने रिक्षा व्यवसाय सुद्धा आर्थिक अडचणीत सापडत चालला असल्याच्या भावना रिक्षा चालकांनी व्यक्त केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular