25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्याला लाभलेली १०८ रुग्णवाहिका जीवनदायी, ८ वर्षात ४७४ बालकांचा जन्म

जिल्ह्याला लाभलेली १०८ रुग्णवाहिका जीवनदायी, ८ वर्षात ४७४ बालकांचा जन्म

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा १०८ रुग्णवाहिकेचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो.

कोणत्याही मेडिकल इमरजन्सी साठी शासनाकडून १०८ रुग्णवाहिका बऱ्याच वर्षापासून उपलब्ध करून दिलेली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातून अनेक नागरिक गरजेच्या वेळेला या रुग्णवाहिकेचा उपयोग करून घेतात. अनेक ठिकाणी गावामध्ये रुग्णांना वाहनाची उपलब्धता नसते त्यावेळी शासनाच्या या सुविधेचा लाभ जनता घेते आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा १०८ रुग्णवाहिकेचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो.

१०८  या आपत्कालीन रुग्णवाहिकेत मागील ८  वर्षात ४७४ बालकांचा जन्म झाला आहे. जिल्ह्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत आलेल्या हजारो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.

मागील आठवड्यातच तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथील एका महिलेला पहाटे ३ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका मागवली. केवळ २०  मिनिटातच रुग्णवाहिका त्यांच्यापर्यंत पोहचली. तिथून त्या महिलेला रुग्णालयात घेऊन येत असतानाच त्या महिलेला प्रसुतीकळा वाढल्या आणि असह्य होऊ लागल्या.

त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्ण्वाहिकेतील डॉक्टर आणि सहाय्यकांने प्रसूती रुग्णवाहिकेतच करायची स्थिती निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन, रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला थांबवून तिची प्रसुती करण्यात आली. त्या महिलेने सुखरूपपणे एका मुलीला जन्म दिला. डॉ. विद्या वाघमारे आणि सहायक रोहन मायनाक यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच प्रसुतीचा योग्य निर्णय घेतल्याने त्या अडलेल्या महिलेची प्रसुती सुखरूपणे पार पाडली.

त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा अनेक प्रसूती या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच रुग्णवाहिकेमध्ये पार पडल्या आहेत. रुग्णवाहिकेतील कार्यतत्पर कर्मचार्यांमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular