27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यात अनेक समुद्र किनारी सागरी सुरक्षा कवच अभियान

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक समुद्र किनारी सागरी सुरक्षा कवच अभियान

कोकण आणि त्याला दैवी देणगी म्हणून लाभलेला विशाल समुद्रकिनारा. अनेक पर्यटक सुट्ट्यांमध्ये समुद्राचा अनुभव घेण्यासाठी कोकणात दाखल होतात. जेवढा आल्हाददायक हा समुद्र आहे त्याप्रमाणे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस यंत्रणा सध्या सागरी सुरक्षा कवच हे अभियान जिल्ह्यातील विविध आणि प्रसिद्ध असलेल्या समुद्र किनारी राबवत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक समुद्रकिनारे विस्तृत लाभलेले आहेत. यामुळे समुद्रामार्गे कोणी दहशतवादी येऊन जिल्ह्यात घुसखोरी करून हल्ला करू शकतो, या शक्यतेमुळे सागरी किनारा कितपत सुरक्षित आहे, हे पडताळून पाहण्यासाठी सागरी सुरक्षा कवच हे अभियान जिल्ह्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर राबवण्यात आले.

हे अभियान सुरु असताना, रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदार या अभियानाच्या वेळी सतर्क राहिले आहेत का, याची पाहणी केली. या अभियानाचा मुख्य उद्देश किनाऱ्यावरील सुरक्षा एवढाच आहे. मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी सागरी मार्गाचा अवलंब केला होता. त्यामुळे जर कोकणात अनोळखी व्यक्ती बोट घेऊन समुद्रामार्गे दाखल झाल्या तर यंत्रणा किती अलर्ट आहेत,  हे या मोहिमेमध्ये तपासण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व जेटींवरील पोलीस चौकी तसेच विविध ठिकाणांचे तपासणी नाके किती सतर्क आहेत,  हे या अभियाना अंतर्गत तपासण्यात आले. त्याचप्रमाणे समुद्र किनारी वास्तव्यास असणाऱ्या जनतेला सुद्धा त्यांनी आवाहन केले आहे कि, समुद्रकिनारी किंवा आसपास काहींही संशयित हालचाली जाणवल्या, काहीही गैर दिसले तर लगेचच स्थानिक व जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क करण्यास डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular