29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriरत्नागिरीत २४ हजार जणांचे रेशन बंद होणार…

रत्नागिरीत २४ हजार जणांचे रेशन बंद होणार…

प्रतिक्षेत यादीवर असलेल्या लाभार्थ्यांना हे धान्य मिळण्याची शक्यता आहे

सलग सहा महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या जिल्हयातील १० हजार २२१ रेशनकार्डवरील २४ हजार जणांचे रेशनवरील धान्य बंद होण्याची शक्यता आहे. या व्यक्तींचे धान्य प्राधान्य योजनेतील प्रतीक्षा बादीतील कार्डधारकांना दिले जाणार असून, त्यापूर्वी पुन्हा एकदा यासर्वच लाभार्थ्यांची पडताळणी होवून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर २०२४ ते मे २०२५ च्या कालावधतील राज्यातील ३ लाख ३३ हजार ८८१ रेशनकार्डवरील ८ लाख ७३ हजार ०६३ इतक्यांनी धान्य उचललेले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रेशनकार्ड धारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याचा अनेकजण गैरवापर करत असल्याचे काही प्रकार समोर आल्याने या योजनेचे लाभार्थी असूनही धान्य उचलत नाहीत. अशा ग्राहकांचे धान्य बंद करून ते इतर प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना देण्यात यावे, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशिनवरून वितरित माहितीच्या आधारे सलग गेल्या सहा महिन्यात धान्याची उचल न केलेल्या १० हजार २२१ कार्डावरील २४ हजार ०३ जणांची यादी तयार केली आंहे. धान्य बंद केले जाणार आहे. त्यामुळे प्रतिक्षेत यादीवर असलेल्या लाभार्थ्यांना हे धान्य मिळण्याची शक्यता आहे

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सर्व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड ३५ किलो धान्य आणि प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य पाच किलो मोफत धान्य दिले जाते. केशरी कार्डधारकांना याचा लाभ मिळतो. शहरी भागातील कार्डधारकांसाठी वार्षि ५९ हजार रूपये तर ग्रामीण भागातील कार्डधारकांसाठी ४४ हजार रूपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. त्यानुसार दरवर्षी प्राधान्य योजनेतील अनेक लाभार्थी धान्य मिळावे प्रतीक्षेत असतात. या यादीच्या अधारे, संबंधितांची खात्री, पडताळणी करून घेण्यात येईल. त्यानंतर या सर्वांचे पावणेतीन लाख ई-केवायसी नाही. रत्नागिरी जिल्ह्यात ३१ जुलै अखेर मुदत देवूनरेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करून घेतली नाही. जिल्ह्यात ५ लाखांहुन अधिक जणांनी ई-केवायसी केली तर २ लाख ७० हजार १०८ कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. अद्याप मुदतवाढीसंदर्भात कोणतेही आदेश नसल्यामुळे या कार्डधारकांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular