28.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeChiplunशिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली संथ, कामे रखडली

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली संथ, कामे रखडली

थम अपडेट करण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख होती.

शिधापत्रिका काढणे आणि असलेल्या शिधापत्रिका अपडेट करण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबवण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे; मात्र मागील आठ दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे (आरसीएमएस) संकेतस्थळ वारंवार बंद आहे. त्यामुळे शिधापत्रिकेच्या संबंधित प्रकरणे प्रलंबित आहेत. थम अपडेट करताना रेशन दुकानदारांची दमछाक होत आहे. चिपळूण तालुक्यात नवीन शिधापत्रिका काढणे, नावे चढवणे, कमी करणे, विभक्त करणे अशा विविध कामांसाठी नागरिक सेतू कार्यालयात येत असतात. काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिकाधारका मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांची शिधापत्रिका मिळवण्यासाठी फरफट होते, तर काही वेळा दलालांकडून नागरिकांची आर्थिक लूट होत होती. असे प्रकार थांबवण्यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) विकसित करण्यात आली आहे. शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नावांची दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे, आदी कामे ऑनलाईन स्वरूपात केली जात आहेत.

तसेच ज्यांची नावे शिधापत्रिकेत आहेत त्यांची नावे सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्यासाठी रेशनकार्ड आणि आधारकार्ड घेऊन रेशन दुकानात जावे लागत आहे. तेथे हाताचे ठसे आणि डोळ्यांचे फोटो घेऊन थम अपडेट केले जात आहे. थम अपडेट करण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. त्यामुळे मंगळवारी रेशन दुकानांमध्ये गर्दी झाली होती; मात्र शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने शिधापत्रिका धारकांची ऑनलाइन स्वरूपात होणारी कामे रखडली होती. संकेतस्थळ सुरू नसल्याने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. नागरिक सातत्याने शिधापत्रिकेच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी येतात. त्यांना ही कामे न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. संकेतस्थळ बंद असल्याने चिपळूण तालुक्यात शिधापत्रिकेसंदर्भात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. चिपळूण तहसील कार्यालयाअंतर्गत नक्की किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याची माहिती तेथील कर्मचारी वरिष्ठांच्या भीतीने देत नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular