29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRatnagiriरत्नदुर्ग माउंटेनिअर्स सह्याद्री जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

रत्नदुर्ग माउंटेनिअर्स सह्याद्री जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

हा सन्मान स्वीकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू व उपाध्यक्षा नेत्रा राजेशिर्के, किशोर सावंत, पराग सुर्वे, जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

रत्नागिरीतील रत्नदुर्ग माउंटेनिअर्सला सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार २०२२  ने सन्मानित करण्यात आले आहे. गेली सव्वीस वर्षे अविरत कार्य करत असणाऱ्या व गिर्यारोहणासोबत अनेक समाजोपयोगी कामात व आपत्कालीन परिस्थितीत सहभागी असणाऱ्या रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे सर्वांनीच तोंड भरून कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व सह्याद्री शिक्षणसंस्थेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते रत्नदुर्ग माउंटेनिअर्सला सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान स्वीकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू व उपाध्यक्षा नेत्रा राजेशिर्के, किशोर सावंत, पराग सुर्वे, जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. या सर्व सदस्यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेमधील मुलांनी साकारलेल्या निरनिराळ्या दुर्मिळ शिल्पांचे कला कौशल्याचे भरभरून कौतुक केले. मनोगत व्यक्त करताना वणजू यांनी संस्थेच्या छोट्या-मोठ्या कामगिरी सोबत पर्यटनदृष्ट्या चाललेल्या छोट्या-मोठ्या धडपडी व त्याला मिळणारे शासकीय पाठबळ याचा उल्लेख करत सह्याद्री शिक्षणसंस्थेने दिलेल्या या जीवनगौरव पुरस्काराबद्दल संस्थेचे व आमदार शेखर निकम यांचे मनःपूर्वक आभार मानले.

पुढे बोलताना ते म्हणाले, या पुरस्कारासाठी टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे नाव निश्चित झाल्यावर टीम रत्नदुर्ग कडून हा सन्मान स्वीकारण्यासाठी टीम रत्नदुर्गचे धडाडीचे अध्यक्ष माननीय श्री. वीरेंद्र वणजु व तळ कोकणामध्ये महिलांमध्ये सर्वप्रथम बेसिक ट्रेनिंग कोर्स करणाऱ्या व ॲडव्हान्स ट्रेनिंग करणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.नेत्रा राजेशिर्के यांची नावे सर्वानुमते निश्चित करण्यात आली. या सोहळ्यासाठी टीम रत्नदुर्गचे इतरही काही टीम मेंबर उपस्थित होते.

या सर्व मेंबर्सनी सदर सोहळ्या मधून सह्याद्री संस्थेकडून केलेल्या आयोजनाचे कौतुक करत आयोजन म्हणजे काय असते, त्याची पूर्वतयारी कशी करावी याबाबत सुद्धा इथे येऊन खूप शिकायला मिळाले असे मनोगतामध्ये सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular