30.2 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriआजपासून रत्नागिरीतील एस.टी वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरु

आजपासून रत्नागिरीतील एस.टी वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरु

मागील वर्षी साधारण मार्चच्या दरम्यान कोरोना व्हायरसचा तडाखा अख्ख्या जगाला मिळाला. देशात, राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अचानक उद्भवलेल्या या संकटाने भीतीचे वातावरण पसरले. कोरोनाच्या या महामारीचा परिणाम इतर उद्योग व्यवसायांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला. अख्खा देश या महामारीमुळे ठप्प झाला होता. अचानक सर्वांचेच व्यवसाय, नोकऱ्या गेल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

रत्नागिरीतील एस.टी वाहतूक सेवा देखील गेले वर्षभर केवळ अत्यावश्यक प्रवासी वगळता बंद ठेवण्यात आली होती. परंतु, आता १० दिवसावर येऊ ठेवलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आजपासून १०० टक्के एसटीच्या फेर्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली आहे. गेली अनेक वर्षे विविध कारणांनी एसटी तोट्यामध्येच आहे. आणि कोरोनाच्या कारणामुळे शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांमुळे ठराविक फेर्या वगळता, एसटी सेवा बंदच ठेवण्यात आलेली, त्यामुळे मोठ्या प्रमाणत आर्थिक फटका महामंडळाला बसला आहे. पण त्या तोट्यातूनही एसटीला सावरण्याचा प्रयत्न अधिकारी आणि  कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे एसटीचे वेळापत्रक कोलमडलेले ते आता १ सप्टेंबरपासून हे वेळापत्रक पूर्ववत करण्यासंबंधी महामंडळाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आज मंगळवार दिवसभराचे शहर आणि ग्रामीण बसफेऱ्यांचे नियोजन वाहतूक अधिकारी, नियंत्रक, आगारव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून सर्वसामान्यांची लालपरी गावागावात, शहरात वाहतुकीसाठी मार्गस्थ झालेली पहायला मिळणार आहे. त्यामुळे यापुढे १०० टक्के क्षमतेने सुरु होणाऱ्या एसटीच्या सेवेला प्रवाशांनी उस्फुर्त प्रतिसाद द्यावा,  असे आवाहन राज्य पहिवहन महामंडळाच्या रत्नागिरी एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular