27.2 C
Ratnagiri
Wednesday, July 9, 2025

गणेशमूर्ती निर्मितीच्या साहित्यांचे दर वधारले – २० ते २५ टक्के वाढ

आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन पुढील...

‘गोगटे’ बाहेरील रस्त्याची दुर्दशा – अभाविप आक्रमक

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या समोरील अरूअप्पा जोशी मार्गावरील...

उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांना शॉक वाढीव वीजबिलांचा फटका

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २५ जून २०२५...
HomeRatnagiriरत्नागिरी विमानतळाच्या कामात अजूनही अनेक अडचणी

रत्नागिरी विमानतळाच्या कामात अजूनही अनेक अडचणी

आवश्यक जमीन प्रशासनाने अधिगृहित केली असली तरीही त्यापोटी देण्यात येणार्‍या मोबदल्याची रक्कम प्रशासनाकडून जाहीर झालेली नाही.

रत्नागिरी विमानतळ काही वर्षे तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. सागरी किनापट्टीच्या सुरक्षेसाठी गोवा ते मुंबई या दरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तटरक्षक दलाचा तळ उभारण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा तळ अतिशय महत्वाचा आहे. काही वर्षांपासून त्याचे विस्तारिकरण सुरू आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक प्रश्न कायम आहेत. मात्र काही अडचणी अजूनही कायम आहेत.

रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारिकरण आणि खासगी विमान वाहतुकीच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामामध्ये अडचणी उत्पन्न होत असल्या तरी, गती मिळात आहे. तालुक्यातील तिवंडेवाडी शिरगावातील सुमारे १८.६८७ एकर खासगी जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रिक्वेंन्सी ओम्री डायरेक्शनल रेडिओ रेंज ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून विमानतळासाठी आवश्यक पॅरॉलल टॅक्सी ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे. येणाऱ्या विमानाला तत्काळ धावपट्टी रिकामी करून देण्यास त्याचा फायदा होणार आहे. संस्थापित नेविगेशनला या उपकरणामुळे विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे.

दुसरे विमान आले तर धावपट्टी रिकामी असणे आवश्यक आहे. म्हणून विमान पर्किंगला मोठी जागा लागणार आहे. एकंदरच विमान वाहतूक सुरु झाल्याने पर्यटन, उद्योग व प्रवासी विमान वाहतूक यांना प्रोत्साहन मिळून रत्नागिरीत विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथे होत असलेल्या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या सुविधांसाठी आवश्यक जमीन प्रशासनाने अधिगृहित केली असली तरीही त्यापोटी देण्यात येणार्‍या मोबदल्याची रक्कम प्रशासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे जागा मालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे विमानतळ विस्तृत करण्यासाठी लागणारी अतिरिक्त जागा मिरजोळे ग्रामस्थांच्या जमिनींबाबत प्रांताधिकार्‍यांकडे सुनावणी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular