रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना काळापासून अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. पण या काळात अनेक युवकांनी रिक्षा व्यवसायाकडे लक्ष वळवले आहे. अनेक जण भाड्याने तर काही जण लोन करून रिक्षा घेतली आहे. परंतु रिक्षा व्यावसायिक जिल्ह्यात अधिक वाढल्याने आणि कोणालाही सर्हास परमिट दिले जात असल्याने रिक्षा व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
शासनाच्या अपरिमित रिक्षा परमिट वाटपाच्या धोरणाविरुद्ध रिक्षा व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. वारंवार विनंती करूनही या धोरणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आरटीओ कार्यालयावर रिक्षा चालक-मालक धडकणार आहेत.
शासनाच्या अपरिमित परमिट वाटपाच्या धोरण रिक्षा व्यवसाय आत धोक्यात आला आहे. औद्योगिक दृष्टीने मागासलेल्या तसेच नैसर्गिक संकटे व पर्यावरणातील बदल यामुळे जिल्ह्यातील शेती, बागायती, मच्छीमारी हे प्रमुख व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून संकटात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अर्थकारणावर याचा मोठा परिणाम झाला असून स्थानिक पातळीवर बाजारावर परिणाम दिसत आहे. या परिस्थितीत खिरापत वाटल्याप्रमाणे रिक्षा परमिट दिली जात आहेत.
परमिट वितरण करत असताना वेळोवेळी रिक्षा संघटनांनी ही बाब प्रशासनाला निवेदनाद्वारे निदर्शनात आणून दिली आहे; परंतु प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे जिल्ह्यातील रिक्षा व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा थेट जाब विचारण्यासाठी जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक आक्रमक झाले असून प्रताप भाटकर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांनी २३ तारखेला आरटीओ कार्यालयात दुपारी २ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्रताप भाटकर यांनी केले आहे.