27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRajapurराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर बसस्थानकासमोर गोव्याकड़ून आलेल्या आयशर टेम्पो (क्र. एमएच १२-यू एम-२५७६) हे वाहन थांबवून आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क पथकाने तपासणी केली. त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे १०५८ बॉक्स (९९४९.० लि.) मिळून आले. मद्य व आयशर टेम्पो असा एकूण रुपये १ कोटी २ लाख ३५ हजार ४४० किंमतीचा मु्द्देमाल जप्त करुन आरोपीवर गुन्हा दाखल केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी बीट क्र ३ रेडींग स्टाफसह अवैध मद्यावर कारवाईं कामी रात्रगस्त घालून संशयित वाहनांची तपासणी करीत असतात. आज सकाळी ०६.१५ च्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर बसस्थानकासमोर गोवा राज्याच्या दिशेकड़ून आलेला वरील क्रमांकाचा आयशर टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे १०५८ बॉक्स (९९४९.० लि.) मिळून आले. या गुन्ह्यात परराज्यातील मद्य व आयशर टेम्पो असा एकूण १ कोटी २ लाख ३५ हजार ४४० रुपये किंमतीचा मु्द्देमाल जप्त करुन आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई). ८१, ८३, ९० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गु्न्ह्याचा पुढील तपास एस.एन.इंगळे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पान शुल्क, भरारी पथक हे करीत आहेत

तसेच दि. २३ ऑक्टोबर, २०२४ रोजी मुंबई-गोबा राष्ट्रीय महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना चंदेराई ते देवधे रस्त्यावरुन देवधे तिठ्यावर आलेली मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार (क्र. एमएच o८-झेड-२८८८) या संशयित वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बनावटीचे ५९.८४ लि. विदेशी मद्य व ३०.२४ लि. देशी मद्य अवैधरित्या वाहतुक करताना मिळून आले. या गुन्ह्यात अवैध देशी / विदेशी मद्य व स्वीफ्ट कार असा एकूण ४ लाख ८ हजार २२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी ‘कायदा १९४९ ‘कलम ६५ (अ) (ई) अन्वये गन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. अमित पाडळकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा भरारी पथक, रल्लागिरी हे करीत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती शेडगे अधीक्षक व उप अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री इंगळे भरारी पथक, महाराष्ट्राज्य तसेच जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक श्री. पाडळकर, सचिन यादव, दुय्यम निरीक्षक, जिल्हा भरारी पथक, चंद्रकांत कदम, दुय्यम निरीक्षक,बीट क्र.०३ व त्यांचा रेडींग स्टाफ यांनी केली.

जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री , परराज्यातील अवेध मद्याची वाहतूक ब मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमाक- ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून करण्यात येत आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी/ खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular