28.8 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriभाट्ये समुद्रात, मुक्तपणे विहार करताना डॉल्फिनचा कळप

भाट्ये समुद्रात, मुक्तपणे विहार करताना डॉल्फिनचा कळप

डॉल्फिनच्या वावरामुळे एक प्रकारे पर्यटन वाढीला देखील मोठा फायदा होणार आहे

जिल्ह्याला लाभलेल्या विशाल समुद्र किनाऱ्यालगत सध्या मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचा कळपाने वावर दिसून येत आहे. या पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या या समुद्री माशाचा वावर दिसू लागल्याने पर्यटकांमध्ये देखील उत्साह संचारला आहे. जयगड नंतर आता भाट्ये समुद्रातही डॉल्फिनचा मोठा कळप समुद्रात मुक्त विहार करताना दिसत आहे. पर्यटकांना ही नवी पर्वणी असून छायाचित्रकारांसाठीही ही विशेष पर्वणी ठरत आहे.

दापोलीमध्ये डॉल्फिनचे दर्शन घडावे, यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्र सफर करतात आणि लांबूनच डॉल्फिनच्या समुद्री कसरती पाहण्याचा आनंद घेतात. दापोली पाठोपाठ जयगड आणि आता भाट्ये समुद्रातही मोठ्या प्रमाणात डॉल्फिन माशाचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. डॉल्फिन हा जलचर प्राण्यांमध्ये मोडतो. डॉल्फिनच्या ४० अस्तित्वात असलेल्या प्रजाती आहेत. शहराजवळील भाट्ये समुद्रामध्ये १०-१२ डॉल्फिनचा झुंड दिसून आला. या झुंडीचा ड्रोन शॉट रत्नागिरीमध्ये काही तासातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

राज्याला लाभलेल्या ७२० किमी समुद्र किनाऱ्यापैकी जिल्ह्याला १८० किमी समुद्र किनारा लाभला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जैववैविधता आढळून येते. डॉल्फिनबरोबर विविध प्रकारचे जेलिफिश व अन्य विविधतेच्या जल वनस्पती आढळून येतात. जिल्ह्याच्या किनाऱ्यावर डॉल्फिनला असुरक्षित वाटेल असे काही नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचा वावर दिसत आहे.

डॉल्फिनच्या वावरामुळे एक प्रकारे पर्यटन वाढीला देखील मोठा फायदा होणार आहे. मात्र त्या अनुषंगाने प्रयत्न होणे देखील तेवढेच गरजेचे आहे. रत्नागिरीतील छायाचित्रकार सुप्रिया खवळे यांनी डॉल्फिनच्या झुंडीचा हा ड्रोन शॉट घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular