25 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriपालिकेच्या कारभारावर नाराजी, नुकसान भरपाईची मागणी

पालिकेच्या कारभारावर नाराजी, नुकसान भरपाईची मागणी

रत्नागिरीमध्ये पावसाची सुरु असलेली संततधार आणि खड्डेमय रत्नागिरीमुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहरात पावसाच्या पाण्याने आणि नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे हे नुकसान झाले असून, रत्नागिरी परिषदेने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

भाजप नगरसेवक सत्ताधिकाऱ्यांच्या या अनागोंदी कारभाराबाबत आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात भाजपच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,  गटारांची उंची कमी असल्या कारणाने आणि सफाई केली गेली नसल्याने, अनेक ठिकाणी सखल भागी गटारे ओव्हरफ्लो होऊन ते घाणीचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे.  गेली अनेक वर्ष काही भागातील गटारे ही त्याच अवस्थेमध्ये आहेत.

रत्नागिरी नगर परिषदेचा सांडपाणी किंवा पावसाळी पाण्याचा निचरा होईल, असा सर्व्हे केलेला आढळून आलेला नाही. विविध प्रभागातील येथील वाढलेली लोकसंख्या पाहता गटारांचे नूतनीकरण झालेले दिसत नाही. त्यामुळे सांडपाणीसोबत सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी रत्नागिरी शहर परिसरामध्ये रस्त्यावरुन वाहते, त्यातच खोदलेले रस्ते पडझड झालेली गटारे पावसापूर्वी न झालेली नालेसफाई व गटार सफाई यातून नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे होणारे नुकसान भरपाई परिषदेने द्यावी, अशी मागणी रत्नागिरी शहर भाजपाने केली.

निवेदन देण्याकरिता भाजप शहराध्यक्ष राजीव कीर, सचिन करमरकर, संदीप सुर्वे, राजेंद्र पटवर्धन, भैय्या मलुष्टे आदी सदस्य उपस्थित होते. रत्नागिरी शहरातील गटारे, नाले, पऱ्या यांचे सर्वे करुन त्यांचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular