28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा...
HomeRatnagiriरत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा या ठिकाणी होणार असल्याची माहीती माहिती दिली आहे. यामुळे रत्नागिरीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील वर्ष कोरोना महामारी बरोबर दोन हाथ करण्यात गेले. त्या दोन वर्षात सर्व सार्वजनिक, शासकीय,खाजगी  कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. ना कोणता सन, उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला ना कोणता सोहळा. अनेकांच्या घरामध्ये कोरोना मुळे सदस्य मृत झाले. त्यामुळे एक प्रकारे हि दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेली.

दरवर्षी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणारा अभूतपूर्व प्रजासत्ताक दिनाचा सोहळा कोरोना महामारीमुळे होणार की नाही! अशी सल रत्नागिरीकरांच्या मनात होती. मात्र निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा या ठिकाणी होणार असल्याची माहीती माहिती दिली आहे. यामुळे रत्नागिरीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्याचे परिवहन व संसदीय कार्य मंत्री आणि रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन, यंदा प्रजासत्ताक दिनाचा  ७२ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०९.१५ वाजता संपन्न होणार आहे.

कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेवून कोणत्याही प्रकारे प्रभात फेऱ्या वा इतर प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नाही आहेत. त्याचप्रमाणे, मुख्य शासकीय सोहळयाला गर्दी होणार नाही आणि कोरोना निर्बंध लक्षात ठेवून सुरक्षित अंतराचे नियम तसेच मास्क आणि सॅनिटायझरचे नियम सर्वांनी पाळावे अशी माहिती श्री. खांडेकर दिली आहे. मागील वर्षी गर्दी होऊ नये यासाठी या सोहळ्याचे प्रक्षेपण ऑनलाईन सुद्धा करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी स्टेडियमवर प्रजासत्ताकदिनी होणारा मुख्य सोहळा ०८.३० ते १०.०० च्या दरम्यान असणार असल्याने, त्या वेळेमध्ये कोणताही इतर ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा वाटल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० च्या पूर्वी किंवा १०.०० च्या नंतर करावा,  असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular