27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiri“त्या” दोन रिक्षा चालकांना प्रसादाच्या लाडूमधून गुंगीचे औषध दिल्याची शक्यता

“त्या” दोन रिक्षा चालकांना प्रसादाच्या लाडूमधून गुंगीचे औषध दिल्याची शक्यता

दोन्ही रिक्षा चालकांना हिंदीत बोलणारे पर्यटक चोरटे गणपतीपुळे येथे घेउन गेले असल्याचे त्यांनी शुद्धीत आल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरी भागामध्ये शनिवारी दोन रिक्षाचालकांना गुंगीचे औषध देउन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, एटीएम कार्ड असा ऐवज लांबवल्याची घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटना गणपतीपुळे येथे जाताना घडल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही रिक्षा चालकांना हिंदीत बोलणारे पर्यटक चोरटे गणपतीपुळे येथे घेउन गेले असल्याचे त्यांनी शुद्धीत आल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे.

आशिष संजय किड्ये वय २९, रा.धनजीनाका,रत्नागिरी आणि विनेश मधुकर चौगुले वय ४५, रा.कसोप, रत्नागिरी अशी रिक्षा चालकांची नावे आहेत. या दोघांनाही बेशूध्द अवस्थेत जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशिष सकाळी आठच्या सुमारास श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी कोल्हापूर येथील तीन पर्यटकांना घेऊन गेला होता. दुपारपर्यंत तो परतला नसल्याने त्याचे वडील त्याला सारखे फोन करत होते. पण तो फोन उचलत नव्हता. दुपारी आशिषला मारहाण व गुंगीचे औषध देऊन बेशुद्धावस्थेत रिक्षासह पटवणे येथे आणून सोडल्याचे वृत्त समजले.

रविवारी ते शुध्दीत आल्यावर त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आम्हाला दोघांनाही गणपतीपुळे येथील भाडे मिळाल्याची तसेच दोन्ही रिक्षांमधील लुबाडणूक करणारे पर्यटक चोरटे हिंदी भाषेत बोलणारे असल्याचे सांगितले. यातील आशिष किड्ये यांना नेवरे गावाच्या पुढे आपण रत्नागिरीमध्ये कसे पोहोचलो ते आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडील ७८ हजार रुपयांचा ऐवज लुबाडण्यात आला.

तर विनेश चौगुले यांना गणपतीपुळे येथूनच आपण रत्नागिरी येथील चंपक मैदानात कसे आलो ते आठवत नसल्याचे पोलिसांना सांगून त्यांच्याकडील ५८  हजार रुपयांचा मुद्देमाल या पर्यटक म्हणवणाऱ्या चोरट्यानी लांबवला आहे. त्यामुळे आता या सराईत चोरट्यांच्या टोळीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. ते बेशुद्ध कसे पडले याचा देखील शोध घेणे सुरु आहे. गणपतीपुळे येथील लाडूचा प्रसाद त्यांनी घेतला असता, त्या लाडूमधून काहीतरी गुंगीचे औषध देण्यात आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular