28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriअखेर शहर पोलिसांच्या पथकाने “त्या” तोतया पोलिसाला घेतले ताब्यात

अखेर शहर पोलिसांच्या पथकाने “त्या” तोतया पोलिसाला घेतले ताब्यात

हि फसवणूकीची ही घटना ७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास शिवाजी नगर धन्वंतरी हॉस्पिटलजवळील फोम वॉश रॅम्पजवळ घडली होती.

रत्नागिरी शहरी भागामध्ये मागील महिन्यामध्ये एका महिलेला बनावट पोलीस असल्याचे भासवून, त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन ते कागदात गुंडाळून ठेवतो सांगून त्या जागी खोटे धातूचे दागिने बांधून देऊन फसवणूक करण्यात आली होती. सदर महिलेने केलेल्या तक्रारीवरून, पोलीस आरोपीच्या मागावर होते. अनेक माध्यमातून गुन्हेगाराचा शोध सुरु होता, अखेर पोलिसांना आरोपीची खबर लागली.

महिलेकडून मंगळसूत्र आणि सोन्याच्या बांगडया घेऊन १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज घेउन फसवणूक करणार्‍या तोतया पोलिसाच्या शहर पोलिसांनी बुधवारी मुसक्या आवळल्या. हि फसवणूकीची ही घटना ७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास शिवाजी नगर धन्वंतरी हॉस्पिटलजवळील फोम वॉश रॅम्पजवळ घडली होती.

शब्बीर जावेद जाफरी रा.३४, मूळ रा.लोणी काळभोर हवेली, पूणे सध्या रा.परळी वैजनाथ,बीड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी ६ जून पर्यंत पोलिस कोठडीत केली. याबाबत श्रद्धा शिवाजी पावसकर वय ६२, रा.आरोग्य मंदिर, रत्नागिरी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार,शनिवारी ७  मे रोजी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे आरोग्य मंदिर ते नरहर वसाहत अशा चालत जात होत्या. त्या धन्वंतरी हॉस्पिटलजवळील फोम वॉश रॅम्प येथे आल्या असतात दोन अज्ञातांनी त्यांना पाठीमागून हाक मारली.

आपण पोलीस असल्याचे सांगत त्यांनी श्रद्धा पावसकर यांच्याकडील मंगळसूत्र व सोन्याच्या २ बांगडया घेऊन बदल्यात धातूच्या बांगड्या कागदात बांधून देत फसवणूक केली होती. या प्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून या तोतया पोलिसाना ताब्यात घेतलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular