27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriजिल्हा शासकीय रुग्णालयात, त्वरित रिक्त पदे भरण्याची मागणी

जिल्हा शासकीय रुग्णालयात, त्वरित रिक्त पदे भरण्याची मागणी

जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे न भरल्यामुळे रुग्ण दगावण्याचा जास्त धोका असतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, अनेक विकासकामांचा शुभारंभ त्यांनी केला आहे. त्यामध्ये अनेक विभागामध्ये असलेल्या अडचणींचा देखील त्यांनी आढावा घेतला आहे. त्यामध्ये मुख्य करून आरोग्य विभागामध्ये रिक्त असलेल्या पदांची संख्या आणि असलेली मागणी याबाबत भाजपाचे जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात रोज जिल्हाभरातून अनेक रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात. मात्र रुग्णाला तपासणीसाठी दाखल केल्यानंतर येथे योग्य वैद्यकीय तज्ज्ञच नसल्यामुळे रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना तुम्ही रुग्णाला मुंबई, पुणे कोल्हापूर या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटल घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्वरित ही रिक्त पदे भरण्याची मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जिल्हा शासकीय रुग्णालयात एम. डी. फिजिशियन, भूलतज्ज्ञ, आर्थोपेडिक सर्जन, त्वचा रोगतज्ज्ञ, टी. बी. रोगतज्ज्ञ, मेंदूतज्ज्ञ, नर्सेस,  न्युरोलॉजीस्ट सर्जन, पोट विकारतज्ञ, कान, नाक घसा सर्जन, किडनी विकारतज्ज्ञलॅब टेक्निशियन, एक्स-रे तज्ञ, वॉर्डबॉय, ड्रायव्हर, क्लार्क इत्यादी रिक्त पदांमुळे रुग्य सेवेवर गंभीर परिणाम होत असतो. ही पदे भरण्याची मागणी निवेदनात केली आहे

पुढे भाटलेकर म्हणाले की, जिल्ह्यासाठी आपण पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये शासकीय मेडीकल कॉलेज मंजूर केल्याबद्दल आभार मानतो. परंतु जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे न भरल्यामुळे रुग्ण दगावण्याचा जास्त धोका असतो. या सर्वांमुळे रुग्णाचे नातेवाईक आणि हॉस्पिटलचे प्रशासन यांच्यात वारंवार खटके उडतात. कधीकधी हे सर्व प्रकरण मारामारीपर्यंत जाते. त्यामुळे या सर्व प्रकरणात आपण जातीनीशी लक्ष घालून जिल्हा शासकीय रुग्णालयातील खालील असणारी रिक्त पदे त्वरित भरावीत. उपजिल्हा रुग्णालय आणि इतर ग्रामीण रुग्णालय यांची परिस्थितीसुद्धा अशीच आहे. तरी आपण या बाबत तातडीने लक्ष घालून रत्नागिरी जिल्हा रुग्लायाबाबत रिक्त पदांचा आढावा घेऊन तातडीने रिक्त पदे भरून मंजूर करावीत, अशी मागणी भाटलेकर यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular