28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

धावत्या रेल्वेतून उतरणे तरूणाच्या आले अंगाशी…

अति घाई आणि संकटात नेई, असे म्हणतात....

कडवई पाझर तलावाचे काम १८ वर्षे लोटली तरी अर्धवट

कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचे काम...

वार्ता विघ्नाचीच! गणेशोत्सवासाठी आलेल्या तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत रत्नागिरी जिल्हयात दुर्घटना ओढावत...
HomeRatnagiriस्वत:च्या रक्तदानाचा विक्रम, स्वत:च मोडला

स्वत:च्या रक्तदानाचा विक्रम, स्वत:च मोडला

रक्तदान हेच श्रेष्ठ दान. अनेक प्रकारची दान केली जातात. परंतु, गरजेच्या वेळी उपयोगी पडून एखाद्याचा जीव वाचविणे हे सर्वश्रेष्ठ ठरत. रत्नागिरीमधील जिल्हा रुग्णालयामध्ये रेड क्रॉस रक्तपेढीमध्ये काही काळ रक्ताचा तुटवडा जाणवत होता. अनेक संस्थांनी सामाजिक कार्य म्हणून हातभार लावून कायम तेथील मागणी पूर्ण करून रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गोरगरीब जनतेच्या मदतीला काळ वेळ न बघता सेवा देण्यासाठी कार्यतत्पर असलेल्या व्यक्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्या व्यक्तीचे नाव आहे जकी खान. शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेणा-या रुग्णांना सर्वतोपरी मदत करणारा म्हणून त्याची ओळख आहे.  ऐनवेळी रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासतो, त्यामुळे जकी खान सातत्याने कोरोना व्हर्सेस हेल्पिंग हॅण्ड या आपल्या संघटनेच्या वतीने सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्त पेढीमध्ये पुरेसा साठा उपलब्ध राहील इतपत सामाजिक कार्याद्वारे समाजसेवा करत असतो. त्याने कोरोना काळामध्ये  घेतलेल्या रक्तदान शिबीरामध्ये १२५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन रत्नागिरीत पहिल्यांदाच एका शिबिरात शतकापर्यंत मजल मारली होती.

१४ नोव्हेंबर रोजी स्वतःची मुलगी जाराच्या वाढदिवस निमित्ताने आणि बालदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले  होते. तरुण आणि तरुणींनी उत्स्फूर्त पणे या शिबिरात सहभाग घेवून जकी खानचा मागील रक्तदात्यांचा आकडा मागे टाकत तब्बल १५१ रक्तदात्यांनी आज रक्तदान करुन जकी खानने आपलाच मागचा विक्रम मोडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

एवढ्या अधिक प्रमाणात केल्या गेलेल्या रक्तदान म्हणजे जकी खान करत असलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणायची. जकी खानने केलेल्या या कामाचे कौतुक सर्वत्र होत असून लोकांच्या अडीअडचणीला काळ वेळ, जातपात न पाहता मदतीला धावणा-या या निस्वार्थी व्यक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्याच्या हातून भावी काळात अशीच सेवा व्हावी अशी भावना व्यक्त होत आहे. प्रत्येक रक्तदात्याला उत्कृष्ट शिल्ड ही भेट म्हणून देण्यात आली असून, ही शिल्ड रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध साखरकर फर्निचर यांनी या सामाजिक कार्यासाठी प्रायोजित केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular