33.4 C
Ratnagiri
Wednesday, March 12, 2025

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...

वर्षभरात जिल्ह्यात १३७ बालकांचा मृत्यू, दोन मातांचाही

जिल्ह्यात मातामृत्यूचे प्रमाण कमी असले तरीही बालमृत्यूचे...

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचा कायापालट

शासनाच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत सरकारी...
HomeRatnagiri१२ वीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन

१२ वीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन

जिल्हाधिकाऱी यांनी सध्या सुरु असलेल्या एसटी फेऱ्या वेळेतच सोडण्याबाबत विभाग नियंत्रक यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा पार पडत आहे. कोरोनाचा जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. मात्र कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करावं लागणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना मास्क आणि हँड सॅनिटायजर जवळ ठेवणे आवश्यक असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षा ०४ मार्चपासून सुरु होत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये मागील तीन महिन्यापासून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी त्यांच्या दालनात एसटी महामंडळ संप आणि आजपासून सुरु होणाऱ्या १२ वीच्या परिक्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्राच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे,  त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने बैठक घेतली.

या बैठकीला विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी, शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग,  जि.प. रत्नागिरी  हे उपस्थित होते. ही परीक्षा एकूण २ सत्रात पार पडणार आहे. त्यानुसार सकाळी १०.३० ते २ आणि दुपारी ३ ते ६.३० या वेळेत परीक्षा पार पडणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न वाचण्यासाठी १० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात येणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न आधी सोडवायचे, याचा प्राधान्यक्रम निवडण्यास मदत होणार आहे.

तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ३० मिनिटं आधी पोहचावे लागणार आहे. एसटी संपामुळे जर आपल्या कोणाला परीक्षेसाठी जाणारी मुले दिसली तर त्यांचेकडे परीक्षेला जाण्याबाबत आवर्जून चौकशी करा. शक्यतो त्यांना इच्छीत परीक्षेस्थळी पोहचविण्यास सहकार्य करा. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन पाटील यांनी बैठक घेऊन संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

जिल्हाधिकाऱी यांनी सध्या सुरु असलेल्या एसटी फेऱ्या वेळेतच सोडण्याबाबत विभाग नियंत्रक यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. चालक/वाहक यांना रस्त्यावर विद्यार्थ्यांनी गाडी थांबविण्याच्या सूचना केल्यास गाडी थांबवून त्यांना बसमध्ये प्रवेश देण्याबाबतही सांगितले आहे. तसेच ज्या भागात फेऱ्या सुरू  नाहीत, मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे अशा शाळांनी संबधित तालुक्यातील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे शिक्षणाधिकारी  यांनी मुख्याध्यापकांना कळवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular