रत्नागिरी आणि सिंधुर्दुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना संक्रमितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सगळीकडे संपूर्ण लॉकडाऊन असून सुद्धा कोरोना संक्रमितांची संख्या घटण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. यासाठी विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलीस पहिल्या लॉकडाऊन पासून कडक कारवाई करताना दिसत आहेत. तरीही काही बेजबाबदारपणे कारणाशिवाय फिरताना, मास्कशिवाय सर्वत्र वावरताना दिसत आहेत.
रत्नागिरी पोलिसांनी सुद्धा यावेळी कडक कारवाईचे धोरण स्वीकारल्याने जे कोणी वायफळ फिरताना दिसतील अशांची कोरोना टेस्ट करणे सक्तीचे केले आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी वाहन जप्ती करणे सुद्धा बंधनकारक केले आहे. त्यामुळे निदान या कोरोनाच्या भीतीमुळे तरी लोक शासनाने आखून दिलेल्या नियमांचे आणि शिस्तीचे पालन करून घरामध्ये राहतील. जिल्ह्यामध्ये ५५ ठिकाणी नाकाबंदीचे सत्र अवलंबले आहे. जिल्हांतर्गत प्रवासासाठी इ-पासची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, तरीसुद्धा काही लोक विनापास सुद्धा प्रवास करण्याचा प्रयत्न करताना दिसतात, परंतु रत्नागिरी सीमेवरून अशा नागरिकांना परत पाठवण्यात येत आहे. कायद्याचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
लॉकडाऊन असूनसुद्धा विनाकारण फिरणाऱ्यावर केल्या गेलेल्या कारवाईमध्ये विनामास्क फिरणार्यापैकी एकूण १८३ जणांचे अहवाल कोरोना संक्रमित आले आहेत. दुसर्या लॉकडाऊन पासून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर एकूण साडे चार हजार केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. त्यांच्या कडून अंदाजे २२ लाखाच्या पटीमध्ये दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही कोरोना काळामध्ये विविध कारणे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचे काम अशा प्रकारची लोक करताना दिसतात. तरीही पोलीस यंत्रणा तेवढ्याच सतर्कतेने दिवसरात्र काम करताना दिसत आहे.