रत्नागिरीमधील कोरोना रुग्ण संक्रमण स्थिती आणि वाढत्या मृत्यूची संख्या आणि रत्नागिरी शासनाचा कारभार लक्षात घेता उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी येत्या सोमवारी २१ जूनला तातडीने रत्नागिरीला येण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोना संक्रमण केसेसमध्ये दुसरा नंबर आहे. रत्नागिरीचा पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केलेल्या उपाययोजना काहीही कामी न आल्याने आज रत्नागिरीची अशी दुर्दशा झालेली आहे, असे जनतेचे म्हणणे आहे. जर मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये पॉझिटीव्हीटी दर घटत असेल तर रत्नागिरी सारख्या लहान भागामध्ये का कमी होऊ शकत नाही असा प्रश्न जनतेकडून प्रशासनाला विचारला जात आहे.
चिपळूणचे कार्यशील नेते आम. शेखर निकम यांनी आज मंत्रालयामध्ये जाऊन उप मुख्यमंत्री ना. अजित पवार आणि आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. आम. शेखर निकम यांनी सांगितलेल्या सर्व स्पष्ट बाबींवरून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या दोन्ही मंत्र्यांनी तातडीने २१ जानेवारी रोजी रत्नागिरीची पाहणी करायला यायचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरीतील जनतेचे या दोन्ही मंत्र्यांच्या भेटीकडे लक्ष लागले असून, रत्नागिरी पॉझीटीव्हीटी दर ५ च्या खाली येऊन रत्नागिरी १००% अनलॉक व्हावी आणि सर्व उद्योग धंदे व्यवसाय पूर्ववत सुरु व्हावेत अशी सकारात्मक भावना प्रत्येक रत्नागिरीकरांच्या मनात आहे. येणारे दोन्ही मंत्री जिल्हा प्रशासनाकडून आज पर्यंतच्या केलेल्या कामाचा आढावा घेतील आणि जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर कशा पद्धतीने कमी करता येईल त्यावर चर्चा मसलत करून उपाययोजनेपर मार्गदर्शन करतील.