30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...
HomeRatnagiriदेवरुखमध्ये पिस्तुलचा धाक दाखवत दरोडा

देवरुखमध्ये पिस्तुलचा धाक दाखवत दरोडा

देवरुख कांजीवरे भागामध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत घरावर दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी सुमारे ५ लाखांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि वस्तू चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. दरोड्याच्या या घटनेने जनसामान्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार नुरुल सिद्दिकी यांचा देवरुख नजीकच्या कांजीवरा येथे भंगार व्यवसाय असून, वास्तव्याला देखील ते तेथेच राहतात. चार अज्ञात व्यक्तीनी शुक्रवारी पहाटे तीनच्या दरम्यान नुरुल सिद्दिकी यांच्या घराच्या मागील बाजुच्या दरवाजाची कडी लोखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. नुरुल यांना कसलातरी आवाजाची चाहूल लागल्याने त्यांनी जाऊन पहिले असता, चारही दरोडेखोरांनी नुरुल यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. नुरुल यांच्या पत्नी सोडवायला मधी जात असताना, त्यांच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवण्यात आला. बेडरुममधील लोखंडी कपाटे स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने उघडून त्यातील सोन्याचे, त्याचप्रमाणे नकली दागिने,  रोख रक्कम, मोबाईल आदी सुमारे ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा ऐवज आणि मुद्देमाल चोरुन नेला.

चारही चोरट्यांच्या तोंडाला काळा कपडा बांधलेला असल्यामुळे दरोडेखोरांचे चेहरे नुरुल यांना नीट दिसले नाहीत. पण कोणत्यातरी माहितगाराचेच हे कृत्य असल्याचा त्यांना दात संशय आहे, कारण काही दिवसांपूर्वी व्यवसायातील भंगार त्यांनी कोल्हापूरला विकले होते, आणि त्याचे पैसे घरातच असतील असा अंदाज असल्याने, कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीचे हे काम असल्याची चर्चा सुरु आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे आणि दरोडेखोरांजवळ पिस्तूल असल्यामुळे सिद्दिकी कुटुंब हादरून गेले आहे. जाताना दरोडेखोरांनी सर्व कुटुंबियांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून, सर्वांचे हातपाय दोरीने बांधून ठेवले. त्याचप्रमाणे नुरुल यांच्याकडे दोन दिवसात पाच कोटींची खंडणी मागितली असून,नाहीतर तुला आणि तुझ्या मुलाला संपवतो अशी धमकी दिली आहे. या घटनेने बिथरलेल्या सिद्दिकी यांनी उजाडताच देवरुख पोलीस स्थानकामध्ये जाऊन, झालेल्या दरोड्याबाबत देवरुख पोलिसांना माहिती दिली. देवरुखचे पोलीस निरीक्षक जगताप यांनी त्वरित सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

सदर गुन्ह्याची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी  डॉ. मोहितकुमार गर्ग सहकार्यांसह त्वरित घटनास्थळी पोहचून, भेटून पिडीतांचे सांत्वन करुन धीर दिला.

RELATED ARTICLES

Most Popular