26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriआजपासून मासेमारीला आरंभ

आजपासून मासेमारीला आरंभ

जिल्ह्यातील हर्णे बंदरातून ५० नौका सोमवारी मासेमारीस उतरणार असून, या नौका बंदरात सज्ज झाल्या आहेत.

सोमवार १ ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी संपणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवरून मासेमारी नौका समुद्रावर स्वार होण्यास सज्ज झाल्या आहेत. जिल्ह्यातील हर्णे बंदरातून ५० नौका सोमवारी मासेमारीस उतरणार असून, या नौका बंदरात सज्ज झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जयगड, आंजर्ले खाडीतील नौका खाडीतूनच मासेमारीसाठी जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, असे येथील मच्छीमारांनी सांगितले आहे.

सध्या काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने आत्ता मासेमारीला पोषक वातावरण सुरु झाले आहे. त्यामुळे हर्णै बंदरातून किमान ५० नौका मासेमारीसाठी जाणार आहेत. २ ऑगस्ट नागपंचमीनंतर दोन हजारांहून अधिक नौका मासेमारीसाठी समुद्रात जाण्यासाठी सज्ज होत आहेत.

दापोली तालुक्यातील हर्णै सर्वांत मोठे बंदर आहे. येथे हंगामामध्ये आजूबाजूच्या गावांमधील मिळून ८०० ते ९०० नौका मासेमारीसाठी दाखल होतात. बंदी कालावधीत बोटीच्या इंजिनाची देखभाल दुरुस्ती, बोटीची रंगरंगोटी, लहान मोठी डागडुजी यांसह जाळ्यांची दुरुस्ती व नवीन जाळ्यांची खरेदी मच्छीमारांकडून करण्यात आली आहे.

गेली काही वर्षे मासेमारीच्या मुहूर्ताच्या काळात समुद्रात चक्रीवादळ, अवकाळी पाउस, मधीच अति उष्णता,  आणि खराब हवामानाचा फटका मच्छीमारांना बसला होता. या वर्षी मात्र पावसाने थोडा विसावा घेतल्याने वातावरण मासेमारीसाठी अनुकूल झाले आहे. त्यामुळे हर्णै बंदरात उत्साहाचे वातावरण आहे. मच्छीमार नौकांची डागडुजीची कामे करण्यात मग्न आहेत. कोणाकडे मासेमारीसाठी तयारी करण्यासाठी आर्थिक समस्या असल्याने त्यांनी अजून कामाला सुरुवात केलेली नाही. हळूहळू या नौकादेखील मासेमारीला उतरतील, असे येथील मच्छीमारांनी सांगितले. बंदर सुरू होणार म्हणून बंदरातील इतर उद्योग सुरू होण्याच्या मार्गावर असून, संबंधित बर्फ कारखाने देखील सुरू झाले आहेत.

गेले आठवडाभर पावसाचा जोरही ओसरला आहे. बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर ट्रॉलिंग मच्छीमारी नौकांना मासेमारीला जाण्यासाठी परवानगी असते. हंगामाच्या सुरुवातीलाच बांगडा, कोळंबी, यासारखी मासळी सापडत असल्यामुळे मच्छीमार आनंदी झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular