27.7 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिल्ह्यात विजयादशमी दिवशी नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

जिल्ह्यात विजयादशमी दिवशी नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

बेंजो आणि संगीताच्या तालावर जिल्ह्यातील ३९४ देवींचे विसर्जन नदी, तलाव आणि समुद्रात करण्यात आले.

जिल्ह्यात घटस्थापनेला सार्वजनिक दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नऊ दिवस दुर्गेच्या विविध रूपांचे पूजन करण्यात आले. ५६ खासगी ठिकाणी मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे नवरात्रौत्सव साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु यंदा गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रौत्सव निर्बंधमुक्त रितीने जल्लोषात साजरा करण्यात आला.

रत्नागिरी शहरात मागील काही वर्षांत नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक देवी मंडळांनी ९ दिवस भरभक्कम विविध कार्यक्रमांचे  आयोजन केले होते. यात महिला, मुलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि सर्वांचा आवडता दांडिया, गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. शेवटचे तीन दिवस दांडियाकरिता रात्री १२ वाजेपर्यंत शासनाने परवानगी दिल्याने युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

जिल्ह्यात विजयादशमीनिमित्त बुधवारी सायंकाळी नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता झाली. बेंजो आणि संगीताच्या तालावर जिल्ह्यातील ३९४ देवींचे विसर्जन नदी, तलाव आणि समुद्रात करण्यात आले. काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या, तरीसुद्धा भाविकांचा उत्साह दांडगा होता. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. गुलालाची उधळण करत आणि फेर धरत भाविकांनी देवींना निरोप दिला. विजयादशमीनिमित्त घरोघरी हत्यारे, शस्त्रांची पूजा करण्यात आली. अनेक ठिकाणी नवीन दुकाने,  उद्योग, व्यवसायांचा श्रीगणेशा करण्यात आला.

दुर्गामातेचा गजर करत वाजत गाजत, बेंजोच्या साथीने देवीच्या विसर्जन मिरवणुका सुमारे पाच तास सुरू होत्या. फटाक्यांची आतिषबाजीसुद्धा करण्यात आली होती. काही गटांनी मिळून एकाच रंगाचे झब्बे, साड्या वापरून सार्वजनिक मंडळांनी एकी दाखवली. विसर्जन मिरवणुकांसाठी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

RELATED ARTICLES

Most Popular