26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriएका रात्रीमध्ये राजकीय सुत्र हलली, रत्नागिरीतील आमदार पोहोचले गुवाहाटीला

एका रात्रीमध्ये राजकीय सुत्र हलली, रत्नागिरीतील आमदार पोहोचले गुवाहाटीला

सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त करत पक्षाविरोधी बंड पुकारले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अभेद्य असलेल्या शिवसेनेला हळूहळू भगदाड पडायाला सुरुवात झाली आहे. दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेचा हात सोडुन देत, एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होणे पसंद केले आहे. आज ते गुवाहाटीला दाखल झाले आहेत. त्यामुळे अचानक झालेल्या या उलथापालथीने रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

मागील वर्षापासून माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची शिवसेनेच्या कारभारावर काही प्रमाणावर नाराजगी दिसून येत आहे. त्यामुळे आमदार कदम यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, सेनेचे संख्याबळ घटत असून एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये वाढ होताना दिसत आहे. माजी मंत्री आणि सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांचे अतिशय घट्ट संबंध आहेत, हे यातून समोर आले आहेत.

सकाळीच आमदार योगेश कदम यांचे वडील माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची आणि एकनाथ शिंदे यांची फोनवर काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलुन आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेची साथ सोडत, एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाल्याचे खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

निवडणुका पार पडल्यापासून राज्याच्या राजकारणाला कालपासून वेगळीच कलाटणी मिळत आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेने मध्येच संपूर्ण उलथापालथ झाली आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त करत पक्षाविरोधी बंड पुकारले आहे. सेनेतील नाराज आमदारांसह अपक्ष आमदार मिळून हा आकडा ४० वरून आता ५० पर्यत जाण्याचा दावा केला आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार आमदारांनी आपली निष्ठा पक्षाशी आहे. अडचणीच्या वेळी आम्ही शिवसेना पक्षाबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील सेना अभेद्य असल्याचे दावा केला होता. यात रत्नागिरीचे आमदार आणि मंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या समावेश होता. दरम्यान, एका रात्रीमध्येच सर्व  राजकीय सुत्र हलली.

RELATED ARTICLES

Most Popular