28.8 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriअखेर १ फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालये होणार सुरु

अखेर १ फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालये होणार सुरु

राज्यातील शाळा २५  जानेवारीपासून सुरु झाल्या पण जिल्ह्यात स्थानिक पातळीवर २६ जानेवारीला पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार होता.

कोरोना काळापासून प्रभाव कमी झाल्यानंतर सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा कोरोनाचा नवीन व्हेरीअंट ओमिक्रोनच्या संकटामुळे बंद करण्यात आलेल्या. राज्यातील शाळा २५ जानेवारी पासून सुरु करण्याचा आदेश शासनाने दिला होता, परंतु, जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहूनच स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असे ठरविण्यात आले. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री अनिल परब हे रत्नागिरीमध्ये आले होते. त्या आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले कि, सर्व शाळा १ फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू करण्यात येतील.

जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या स्थिर असल्याने शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शाळा २५  जानेवारीपासून सुरु झाल्या पण जिल्ह्यात स्थानिक पातळीवर २६ जानेवारीला पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

त्याचप्रमाणे, कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव घटल्याने राज्यातील शाळां पाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे देखील पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्यातील महाविद्यालय देखील  प्रत्यक्ष १ फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत केले जात आहे.

राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्षरित्या १ फेब्रुवारी पासुन पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. परंतु स्थानिक कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापिठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल. त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे कोविड निर्बंधांचे दोन्ही डोस पुर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. १५  फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या किंवा ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे निर्णय घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular