26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriमनसे समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद

मनसे समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद

मनसेतर्फे राबविण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वात एका अभिनव संकल्पनेतून महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी समुद्र किनारपट्टीवरील ४० हून अधिक समुद्र किनाऱ्यांवर काल रविवारी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

याच मोहिमे अंतर्गत रत्नागिरी शहरातही मांडवी समुद्र किनारी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण , मनसे सुरक्षा रक्षक सेना अध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या मार्गदर्शनात स्वच्छता कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिकांसह, कॉलेज विद्यार्थीसोबत मोठ्या संख्येने सहभाग होता. या कार्यक्रमाला खेड शहराचे नगराध्यक्ष व मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते , विविध सामाजिक संघटना , अल्ट्राटेक सिमेंट अधिकारी डहाणूकर साहेब, पाटील व सर्व अधिकारी कर्मचारी ,महाविद्यालयीन विद्यार्थी व इतर सामान्य नागरिकांनी केलेल्या श्रमदानातून एकूण दीड टन एवढा कचरा गोळा करण्यात आला. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष(रत्नागिरी-संगमेश्वर ) रुपेश सावंत , उपजिल्हाध्यक्ष (लांजा -राजापूर) अविनाश सौंदळकर , मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर , राजापूर माजी तालुकाध्यक्ष राजू पवार , मनसे रत्नागिरी शहरअध्यक्ष सतिश राणे , मनसे कामगार सेना चिटणीस छोटू खामकर ,मनसे रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक रूपेश जाधव, महिला उपशहरअध्यक्ष द्वारका नंदाणे, अश्विनी रहाटे, मनसे उपशहरअध्यक्ष मयुरेश मडके , उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण , उपशहरअध्यक्ष अमोल श्रीनाथ उपस्थित होते.

रत्नागिरी शहर समुद्र किनारा प्रतिनिधी व विभागअध्यक्ष अक्षय माईण , माथाडी कामगार सेना जिल्हा चिटणीस गुरु चव्हाण, मनसे सुरक्षारक्षक कामगार सेना जिल्हा चिटणीस अरविंद मालाडकर , विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष चैतन्य शेंडे, विभागअध्यक्ष गजानन आईर , विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष अजिंक्य केसरकर ,शाखाध्यक्ष शैलेश मुकादम , नैनेश कामेरकर, शाखाध्यक्ष राहुल खेडेकर, माजी उपशहर अध्यक्ष बाबूशेठ तळेकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर रत्नागिरी नगरपरिषद आरोग्य विभाग व कर्मचारी,पोलीस प्रशासन,पोलीस वाहतूक शाखा,तसेच सर्व पत्रकार बांधव ह्याचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular