26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriतंत्रस्नेही शिक्षकांना मायक्रोसॉफ्टच्या वतीने पुरस्कार जाहीर

तंत्रस्नेही शिक्षकांना मायक्रोसॉफ्टच्या वतीने पुरस्कार जाहीर

डिसले गुरुजींनी ज्या प्रमाणे आपले अध्यापन तंत्रज्ञानाद्वारे जगभर पोहोचवले त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थ्यानासुद्धा हि शिक्षण पद्धती आवडू लागली आहे.

वर्गातील अध्यापनामध्ये काहीतरी विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे होईल असे तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला वेगळे रूप आणि दर्जा देणाऱ्या शिक्षकांना मायक्रोसॉफ्टच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील तंत्रस्नेही उपक्रशील शिक्षक मयुरेश माने,  गुरुवर्य द. ज. सरदेशपांडे अध्यापक विद्यालय राजापूर कोदवली येथील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक रणजित देसाई आणि मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथील उपक्रमशील शिक्षिका सुलताना भाटकर या तीन अध्यापकांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मयुरेश माने, रणजित देसाई, सुलताना भाटकर यांची निवड करण्यात आली आहे. मयुरेश माने यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सचा सहाय्याने तसेच स्काईपच्या मदतीने अध्यापन कार्यात विविधता आणण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. तर रणजित देसाई यांनी सुद्धा मायक्रोसॉफ्टच्या विविध शैक्षणिक साधने व स्काईपचा वापर करुन, त्याचबरोबर Flipgrid चा वापर करून अध्यापन उत्साही बनवले आहे. या मेहनती व तज्ज्ञ शिक्षकांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

      सलग दुसऱ्या वर्षी रणजित देसाई यांना तर मयुरेश माने यांना रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. डिसले गुरुजींनी ज्या प्रमाणे आपले अध्यापन तंत्रज्ञानाद्वारे जगभर पोहोचवले त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थ्यानासुद्धा हि शिक्षण पद्धती आवडू लागली आहे.  देशातील व परदेशातील शाळांमध्ये ऑनलाईन पध्दतीने टिचिंग केले जात आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक आगळीवेगळी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. तरी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला वाव मिळण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन उपक्रशील शिक्षक मयुरेश माने यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular