26 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeRatnagiriजिल्ह्याला ऑरेंज अलर्ट ! नियमावली जाहीर

जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट ! नियमावली जाहीर

दिनांक 10 जून ते 12 जून या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याकाळात सोसाट्याचा वारा आणि अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक येणारा पूर किंवा भरतीच्या काळात अधिक पाऊस झाल्यास काही भाग जलमय होण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका संपवतो तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी असे जिल्हाधिकारी कार्यालय येथून सांगण्यात आलेले आहे.

अतिवृष्टीच्या दरम्यान नागरिकांनी घ्यावयाची काळजी

 1. मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जाऊ नये.
 2. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे घराच्या बाहेर पडू नये.
 3. अति महत्वाचे काम असल्याखेरीज कोणीही घराच्या बाहेर पडू नये.
 4. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तसेच समुद्र, खाडी,  नदीकिनारी धोकादायक भागात/ पूर क्षेत्रात असल्यास तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधन सामग्री सोबत ठेवून स्थलांतरित व्हावे.
 5. आपले घर दरड कोसळण्याच्या भागात असेल/ तीव्र उतारावर असेल/ सैल मातीच्या भागात असेल किंवा धोकादायक धरणाच्या खालील भागात असेल तर प्रशासनाच्या सहकार्याने जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
 6. घराच्या अवतीभोवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब, तारा,  झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तू पासून लांब राहावे.
 7. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे तसेच जनावरांना कुठल्याही पद्धतीने बांधून ठेवू नये.
 8. आपले जवळ केरोसीन वर चालणारे बंदिस्त दिवे, कंदील, बॅटरी, गॅस बत्ती, स्टोव्ह, काडेपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
 9. हवामान खात्याकडून मिळालेले इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा त्यासाठी काही जास्त बॅटर्‍या जवळ ठेवाव्यात.
 10. सोबत आवश्यक असलेले अन्नधान्य पिण्याचे पाणी औषधे जवळ ठेवावे.
 11. पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून वापरावे उदाहरणार्थ पाणी उकळून प्यावे, पाण्यात मेडिक्लोर मिसळावे डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी मच्छर अगरबत्ती मच्छरदाणीचा वापर करावा.
 12. ग्रामकृती दलाच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाय योजना कराव्यात.
 13. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोवीड क्वारंटाईन / आयसोलेटेड असलेले नागरिक व चक्रीवादळाचे पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित पाठवताना एकमेकात मिसळणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
 14. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.
 15. मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसीलदार कार्यालय / जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 0 2352-226/248, 222233  वर संपर्क साधावा किंवा 7057222233 नंबर वर व्हाट्सअप करावे

मा. लक्ष्मीनारायण मिश्रा

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी

-कडून प्रसारित

RELATED ARTICLES

Most Popular