26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriजिल्ह्यात २० आणि २१ जून या दोन दिवसांमध्ये ऑरेंज अर्लट जारी

जिल्ह्यात २० आणि २१ जून या दोन दिवसांमध्ये ऑरेंज अर्लट जारी

पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. शेतीची मशागत आणि पेरणी कधी होणार याच चिंतेत तो दिसत आहे.

१९ जून २०२२ रोजी जिल्ह्यात भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच २० जून २०२२ व २१ जून २०२२ या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे जोरदार ते अति जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अगदी दमदार हजेरी लावली. मात्र, काही ठिकाणी अजून अत्यंत अल्प प्रमाणात आहे तर काही ठिकाणी एक थेंब देखील शिंपडला गेला नाही आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. शेतीची मशागत आणि पेरणी कधी होणार याच चिंतेत तो दिसत आहे. तर नाशिक सारख्या दुर्गम भागात पावसाळा सुरू होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

दरम्यान,  पावसाच्या बाबतीत आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासकट मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. त्यानंतरच्या ३ दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊल होईल. शेतकऱ्यांना एक प्रकारचा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नाहीतर दुबार पेरणीची वेळ येते कि काय, अशी द्विधा अवस्था निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular